
भाग्यनगर (तेलंगाणा) – येथील द्विमुखी हनुमान मंदिरातील मूर्तीची २४ फेब्रुवारीला अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली. श्री हनुमानाच्या मूर्तीवरील शेंदुर काढून टाकण्यात आले. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक करण्याचे प्रयत्न चालू आहेत.
या तोडफोडीचा निषेध करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष एन्. रामचंदर राव यांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. तेलंगाणामधील देवतांच्या मूर्तींवरील आक्रमणे सनातन धर्माविरुद्ध रचलेल्या कटाचा भाग आहे. मंदिरांमधील विटंबना आणि तोडफोड यांच्या घटना, तसेच हिंदूंच्या सणांना लक्ष्य केले जाणे यामुळे राज्यातील कायदा अन् सुव्यवस्थेला धोका निर्माण होत आहे. समाजविघातक घटकांवर कारवाई करण्यात काँग्रेस सरकार अपयशी ठरत असून मतपेढीच्या राजकारणात गुंतले असल्याचा आरोप राव यांनी केला.
(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक)
संपादकीय भूमिकाअशा घटना रोखण्यासाठी संबंधितांना फाशीचीच शिक्षा करायला हवी ! |
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
नागपूर येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीवरील सोन्याची साखळी चोरणार्या ३ धर्मांधांना अटक !