
नाशिक – येथील महानगरपालिकेच्या वतीने प्रत्येकी १ सहस्र दर्शनी मूल्य असलेल्या मूल्यमापन, सूचीबद्ध, करपात्र, असुरक्षित, प्रतिदेय आणि अपरिवर्तनीय ‘ग्रीन म्युनिसिपल बाँड्स’ची (हरित महानगरपालिका कर्ज रोखे) घोषणा करण्यात आली आहे. हे रोखे कर्ज रोखे स्वरूपात असून त्यामध्ये प्रत्येकी १२५ रुपये दर्शनी मूल्याचे ८ स्वतंत्र, हस्तांतरणीय आणि प्रतिदेय मुख्य भाग समाविष्ट आहेत.

हे रोखे २५ फेब्रुवारी या दिवशी प्रसिद्ध होतील आणि २ मार्च या दिवशी बंद होईल. हे रोखे, तसेच ८.०५ टक्के कूपन दर (सहामाही देय) आणि ८.२० टक्के वार्षिक प्रभावी यील्ड (लाभांश) असेल. हे रोखे ‘प्रथम येणार्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर दिले जाईल. या रोख्यांमधून मिळणारी रक्कम प्रकल्पाशी संबंधित भांडवली खर्चासाठी वापरण्याचे प्रस्तावित आहे. यामध्ये मुकाणे जलपुरवठा योजनेचा विस्तार – जलशुद्धीकरण केंद्र, विल्होली ते गांधीनगरपर्यंत ग्रॅव्हिटी मेन (गुरुत्वाकर्षण आधारित मुख्य जलवाहिनी) वाहिनीचे बांधकाम आणि सिंहस्थ कुंभपर्वासाठी साधूग्राम अन् नीलगिरी बाग जलशुद्धीकरण केंद्राचे बांधकाम यांचा समावेश आहे.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !