‘कांतारा’ चित्रपटाच्या प्रकरणात अभिनेते रणवीर सिंह यांना देवतेचा अवमान केल्यावरून कर्नाटक उच्च न्यायालयाने फटकारले

बेंगळुरू (कर्नाटक) – कोणत्याही व्यक्तीस स्वतःच्या प्रतिभेच्या आडून लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा अधिकार नाही. ‘सुपरस्टार’ (सुप्रसिद्ध अभिनेते) कायद्यापेक्षा वर नसतात, अशा शब्दांत कर्नाटक उच्च न्यायालयाने अभिनेते रणवीर सिंह यांना फटकारले. गेल्या वर्षी गोव्यात आयोजित ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’मध्ये ‘कांतारा’ या हिंदी चित्रपटाविषयी वक्तव्य करतांना देवतांचा अवमान केल्यावरून न्यायालयाने सिंह यांना फटकारले. सध्या राज्य सरकारला रणवीर सिंह यांच्या विरोधात कोणतीही दडपशाही किंवा दंडात्मक कारवाई करू नये, असे निर्देश देण्यात आले. पुढील सुनावणी २ मार्च या दिवशी होणार असून तोपर्यंत रणवीर सिंह यांना अन्वेषणात पूर्ण सहकार्य करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
⚖️ Karnataka HC slams Ranveer Singh for insulting a deity in 'Kantara' case.
When public figures disrespect their faith, it emboldens others.
Hindus insulting their own deities sets a bad precedent. Strict action needed to set an example.#RanveerSingh #IFFI#LegalNews… https://t.co/uZ87fwCjAI pic.twitter.com/KyrnXNoCIm
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 24, 2026
अभिनेता म्हणून तुमचे दायित्व अधिक आहे !
न्यायालयाने निरीक्षण केले की, रणवीर सिंह यांनी ज्या अभिनेत्याची, म्हणजे ऋषभ शेट्टी यांची नक्कल केली, ते एका देवतेच्या भूमिकेत अभिनय करत होते. अशा परिस्थितीत केलेल्या टिपण्यांमुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात. तुम्ही रणवीर सिंह असाल किंवा अन्य कुणी, अशा प्रकारची उद्धट भाषा वापरू शकत नाही. अभिनेता म्हणून तुमचे दायित्व अधिक आहे; कारण तुम्ही लाखो लोकांवर प्रभाव टाकता.
क्षमायाचना केल्याने टिपणी मागे घेतली जात नाही !
रणवीर सिंह यांनी या प्रकरणी क्षमा मागितली होती. ‘नंतर मागितलेल्या क्षमेमुळे केलेले वक्तव्य मागे घेतले जाऊ शकत नाही. इंटरनेट काही विसरत नाही, तुम्ही जे बोललात त्याची कायम नोंद राहील. कलाकारांनी विशेष संयम बाळगणे आवश्यक आहे आणि अशा प्रकरणांकडे हलक्यात पहाता येणार नाही. लोकप्रियता किंवा प्रतिभा कुणालाही कायद्यापेक्षा वर नेत नाही’, असे न्यायालयाने ठासून सांगितले.
स्वीकृतीवरून अभिनेता निष्काळजीपणे वागल्याचे सिद्ध होते !
रणवीर सिंह यांच्यावतीने सादर करण्यात आलेल्या युक्तीवादात त्यांचे अधिवक्ता म्हणाले की, संबंधित वक्तव्य पूर्णपणे असंवेदनशील होते आणि ती मोठी चूक होती, याची स्वीकृती अभिनेता देतात.
यावर न्यायालयाने निरीक्षण केले की, या स्वीकृतीवरून अभिनेता निष्काळजीपणे वागल्याचे दिसते.
काय आहे प्रकरण ?
नोव्हेंबर २०२५ मध्ये गोव्यातील इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियाच्या समारोपाच्या सोहळ्यात रणवीर सिंह यांनी रंगमंचावर ऋषभ शेट्टी यांच्या ‘कांतारा चॅप्टर-१’ चित्रपटामधील देवतेशी संबंधित एका प्रसंगाची नक्कल केली. त्यांनी ऋषभ शेट्टी यांच्या अभिनयाचे कौतुक केले आणि त्या दृश्याचा विशेष उल्लेख केला, जिथे देवतेचा त्यांच्या देहात प्रवेश होतो, असे दाखवले आहे; मात्र सिंह यांनी देवतेचा उल्लेख ‘स्त्री भूत’ अशा संदर्भात केला आणि हावभावांची नक्कल केली, ज्यामुळे अनेकांनी विशेषतः तुळू भाषिकांचा आणि कर्नाटकातील देव परंपरेचा अवमान झाल्याचे म्हटले. त्यानंतर सामाजिक माध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या, टीका झाली आणि रणवीर सिंह यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.
संपादकीय भूमिकाहिंदूंच्या देवतांचा अवमान हिंदूंकडूनच अधिक होत असल्याने अशा हिंदूंना कठोर शिक्षा झाल्याखेरीज अन्यांना वचक बसणार नाही ! |
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court
केरळ : अल्पवयीन मुलांना मारहाण करणार्या ख्रिस्ती पाद्रीविरुद्ध संतप्त नागरिक रस्त्यावर !
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे डॉक्टर नदीमने कापली रुग्णाची चुकीची नस !