गोवंशियांची अवैध वाहतूक करणार्‍यांवर उल्हासनगर येथे गुन्हा नोंद !

प्रतीकात्मक छायाचित्र

उल्हासनगर – धोबी घाट नाका येथे मुरबाडपासून कल्याणपर्यंत अवैधपणे गोवंशियांना नेणार्‍या ट्रकचालकावर १७ फेब्रुवारीच्या रात्री कारवाई करण्यात आली आहे. यात ८ म्हशी आणि ३ पारडे अशा एकूण ११ गोवंशियांचा समावेश होता. गोरक्षक श्री. मनोज भोर यांच्या पथकाने पोलिसांचे साहाय्य घेऊन गोवंशियांना पकडले. (गोवंशियांचे रक्षण करणार्‍या गोरक्षकांचे अभिनंदन ! – संपादक) बनावट पावतीवर गोवंशियांची वाहतूक करणार्‍या ट्रकचालकावर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. (पोलिसांची फसवणूक करणार्‍यांना कठोर शिक्षाच करायला हवी ! – संपादक) ट्रकमध्ये गोवंशियांचे चारापाण्याचे, तसेच उभे रहाण्याचेही हाल झाले होते; पण सर्व गोवंशीय सुखरूप होते.

संपादकीय भूमिका

गोवंशियांची अवैधपणे वाहतूक केली जाण्याला गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर कार्यवाही न होणेच कारणीभूत !