|

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये नियमित आणि तात्पुरते नियुक्त झालेले अन् विद्यापिठाची मान्यता असलेले असे एकत्रित किमान ५० टक्के शिक्षक असणे आवश्यक आहे. त्यासाठी ३१ मार्च २०२६ अशी समयमर्यादा दिली आहे. या समयमर्यादेत प्राध्यापकांची भरती न केल्यास परिसंस्थेमधील संबंधित अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील प्रथम वर्गाचे प्रवेश थांबवण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी चेतावणी विद्यापिठाचे उपकुलसचिव प्रदीप कोळी यांनी संलग्न महाविद्यालयांच्या प्राचार्यांना दिली आहे.
विद्यापीठ आणि राज्यशासन यांनी ठरवल्याप्रमाणे प्राध्यापकांची संख्या असणे आणि अभ्यास पाठ्यक्रम, अध्ययन, प्रशिक्षण अन् संशोधन यांसाठी कार्यक्षमतेने योग्य ती उपाययोजना पुरेशी असणे बंधनकारक आहे. ही संलग्नीकरण, तसेच मान्यता याकरताची अट असून त्याचे अनुपालन करणे संलग्न महाविद्यालये, मान्यताप्राप्त परिसंस्था यांना बंधनकारक असते.
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात
गोव्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील सुधारणांसाठी १८० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !