
नवी देहली – ‘भारतीय कम्युनिस्ट पक्ष’ अर्थात् भाकपचे राज्यसभा सदस्य जॉन ब्रिटास यांनी देशातील ‘आय.ए.एस्.’(इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस अर्थात् भारतीय प्रशासकीय सेवा), ‘आय.पी.एस्.’ (इंडियन पोलीस सर्व्हिस अर्थात् भारतीय पोलिस सेवा) आणि ‘आय.एफ्.एस्.’ (इंडियन फॉरेन सर्व्हिस अर्थात् भारतीय परराष्ट्र सेवा) अधिकार्यांच्या रिक्त पदांविषयी केंद्र सरकारकडे प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाला उत्तर देतांना केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत माहिती दिली की, ‘आय.ए.एस्.’, ‘आय.पी.एस्.’ आणि ‘आय.एफ्.एस्.’ या प्रतिष्ठित सेवांमध्ये एकूण २ सहस्र ८३४ पदे रिक्त आहेत.
केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की,
१. १ जानेवारी २०२५ पर्यंत उपलब्ध माहितीनुसार ‘आय.ए.एस्.’ची १ सहस्र ३०० पदे, ‘आय.पी.एस्.’ची ५०५ पदे आणि ‘आय.एफ्.एस्.’ची १ सहस्र २९ पदे रिक्त आहेत.
२. केंद्र सरकारने घोषित केलेल्या आकडेवारीनुसार तिन्ही अखिल भारतीय सेवांमध्ये संमत पदसंख्या आणि प्रत्यक्ष कार्यरत अधिकार्यांची संख्या यांमध्ये मोठी तफावत आहे.
३. ‘आय.ए.एस्.’ची एकूण संमत पदे ६ सहस्र ८७७ असून ५ सहस्र ५७७ अधिकारी कार्यरत आहेत. ‘आय.पी.एस्.’मध्ये ५ सहस्र ९९ संमत पदांपैकी ४ सहस्र ५९४ अधिकारी नियुक्त आहेत. ‘आय.एफ्.एस्.’मध्ये ३ सहस्र १९३ संमत पदांपैकी २ सहस्र १६४ अधिकारी कार्यरत आहेत.
४. उत्तरप्रदेशामध्ये ‘आय.ए.एस्.’च्या ६५२ पदांना स्वीकृती दिली असून ५७१ अधिकारी कार्यरत आहेत. मध्यप्रदेशामध्ये ४५९ पदांपैकी ३९१ अधिकारी कार्यरत आहेत. महाराष्ट्रात ४३५ पदांपैकी ३५९ अधिकारी नियुक्त आहेत. बिहारमध्ये ‘आय.ए.एस्.’ची ३५९ पदांपैकी ३०३ अधिकारी कार्यरत आहेत.
५. केंद्रातील मोदी सरकारने राखीव प्रवर्गांमधून झालेल्या भरतीची आकडेवारीही घोषित केली आहे. इतर मागासवर्गीय २४५, अनुसूचित जाती १३५, तर अनुसूचित जमातीचे ६७ ‘आय.ए.एस्.’मध्ये अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. इतर मागासवर्गीय २५५, अनुसूचित जमातीचे १४१ आणि अनुसूचित जमातीचे ७१ ‘आय.पी.एस्.’ अधिकारी कार्यरत आहेत. इतर मागासवर्गीय २३१, अनुसूचित जातीचे ९५ आणि अनुसूचित जमातीचे ४८ ‘आय.पी.एस्.’ अधिकारी कार्यरत आहेत.
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक
४ वर्षांपासून पसार असलेल्या २ मुख्य आरोपींना अटक !