आळंदीतून माऊलींची मूर्ती जर्मनीकडे रवाना

सातासमुद्रापार दुमदुमणार ‘ग्यानबा-तुकाराम’चा गजर !
आळंदी (जिल्हा पुणे) – जर्मनीतील ‘श्री विठ्ठलधाम, ख्रिसचेम’ येथील विठ्ठल मंदिरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. त्यांपैकी माऊलींची मूर्ती १० फेब्रुवारी या दिवशी राजस्थानहून जर्मनीकडे रवाना झाली आहे. या दोन्ही संतांचे कार्य जगभरात पोचण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल मानले जाते. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचे ७५० वे जयंती वर्ष आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा ४५० वा वैकुंठगमन सोहळा यांचे औचित्य साधून हा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
भागवत धर्माची परदेशी भक्तांना होणार ओळख !
भागवत धर्माचा जगभर प्रचार आणि प्रसार व्हावा या हेतूने देहू आणि आळंदी संस्थानने या मूर्ती जर्मनीतील मंदिराला भेट देण्याचे ठरवले होते. याकामी स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे (औंध) श्रीकांत पाटील यांनी आळंदी-देहू संस्थान आणि जर्मनीतील मंदिर प्रशासन यांच्यात यशस्वी समन्वय साधला. जर्मनीतील या विठ्ठल मंदिराला प्रतिवर्षी सहस्रो परदेशी नागरिक भेट देतात. तिथे या मूर्तीची स्थापना झाल्यामुळे परदेशी भक्तांना दोन्ही संतांच्या आध्यात्मिक कार्याची ओळख होईल.
| अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर प्राणप्रतिष्ठा !
या विशेष उपक्रमासाठी संत ज्ञानेश्वर महाराजांची २ फूट उंचीची मूर्ती जयपूर (राजस्थान) येथील ‘जैन श्वेतांबर मूर्तीकला केंद्र’ येथून ‘मकराना व्हाईट मार्बल’मध्ये सिद्ध करून घेण्यात आली आहे. ही मूर्ती आता जर्मनीकडे प्रवासाला निघाली असून १९ एप्रिल २०२६ या दिवशी अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर जर्मनीमध्ये या दोन्ही संतांच्या मूर्तीचा भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार असल्याची माहिती ‘श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती’चे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ रा. देखणे यांनी दिली आहे. |
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
बोपोडी येथील दर्ग्यावर महापालिकेची कारवाई !
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री