जनता दल (संयुक्त) च्या आमदार कोमल सिंह आणि भाजपच्या आमदार मैथिली ठाकूर यांनी केला विरोध

पाटलीपुत्र (बिहार) – बिहार विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळी भाजपच्या नवनिर्वाचित आमदार आणि प्रसिद्ध लोकगायिका मैथिली ठाकूर यांनी प्रशासनाला धारेवर धरले. राज्यातील आरोग्यव्यवस्थेच्या सूत्रावरून त्यांनी स्वत:च्या सरकारलाच प्रश्न विचारले. तसेच जनता दल (संयुक्त) च्या आमदार कोमल सिंह यांनीही प्रशासनाला त्यांच्या मतदारसंघातील ‘स्टेडियम’च्या अस्तित्वावर उत्तर मागितले.
Patliputra, Bihar
Young women MLAs from the ruling alliance take a bold stand 💪
BJP MLA Maithili Thakur and JD(U) MLA Komal Singh openly questioned the Bihar administration and ministers – putting public interest above party lines.
Leaders who hold their own government… pic.twitter.com/9nx7Ws8A0F
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 14, 2026
१. मैथिली ठाकूर यांनी त्यांच्या मतदारसंघातील तारडीह ब्लॉकमधील ‘कुरसों नदियामी’ येथील अतिरिक्त आरोग्य केंद्राच्या खराब अवस्थेकडे सरकारचे लक्ष वेधले. सरकारने सांगितले की, या रुग्णालयाची केवळ दुरुस्ती करणे आवश्यक आहे; परंतु ठाकूर यांनी दावा केला की, ही इमारत पूर्णपणे मोडकळीस आली आहे. तिचे नवीन बांधकाम करणे आवश्यक आहे. त्यांनी असेही सांगितले की, पूर्वी तिथे दोन आधुनिक वैद्य होते; पण आता आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत केवळ एकच डॉक्टर कार्यरत आहे.
२. दुसरीकडे कोमल सिंह यांनी त्यांच्या मुझफ्फरपूरच्या गायघाट या मतदारसंघामधील ‘स्टेडियम’च्या सूत्रावरून क्रीडा मंत्र्यांना घेरले होते. सरकारी कागदपत्रात स्टेडियम असल्याचे दाखवले जात आहे, पण प्रत्यक्षात ते केवळ जुने मैदान आहे, असा आरोप त्यांनी केला.
संपादकीय भूमिकाजनहित पाहून स्वत: सत्तेत असूनही अशा प्रकारे प्रशासनाला आणि मंत्र्यांना जाहीरपणे उत्तर मागणारे असे आमदार आजच्या काळाची आवश्यकता ! अन्यथा कागदी घोडे नाचवून जनतेची दिशाभूल करण्यासह त्यांच्या समस्या वाढवणे हे अनेक प्रशासकीय अधिकार्यांचे नित्याचे झाले आहे, हे लक्षात घ्या ! |
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा
Puri Rath Yatra : पुरी येथील जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेला प्रारंभ !
बनावट पटसंख्या दाखवून वसतीगृहांच्या नावे कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटले !
Telangana School Kalma Controversy : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे हिंदु विद्यार्थ्याला गृहपाठात ‘कलमा’ पाठ करण्यास सांगणार्या शिक्षिकेला शाळेने नोकरीवरून काढले !
Rajasthan Jail Marriage : राजस्थानच्या कारागृहात जन्मठेपाची शिक्षा भोगणार्या बंदीवानांचा २२ जुलैला होणार विवाह !
शारीरिक संबंध ठेवतांना ती फसवणूक किंवा ब्लॅकमेल असल्यास तो ‘बलात्कार’ मानला जाईल ! – Madras High Court