‘घूसखोर पंडत’ (भ्रष्टाचारी पंडित) चित्रपटावरून सर्वाेच्च न्यायालयाने निर्मात्याला सुनावले

नवी देहली – ‘घूसखोर पंडत’ अशा प्रकारचे शीर्षक वापरून समाजातील एका घटकाची अपकीर्ती का करता? हे नैतिकतेच्या आणि सार्वजनिक सुव्यवस्थेच्या विरोधात आहे. पालटलेले नाव कळवल्याखेरीज चित्रपट प्रदर्शित करण्यास अनुमती दिली जाणार नाही, असे सर्वाेच्च न्यायालयाने १२ फेब्रुवारीला झालेल्या सुनावणीच्या वेळी चित्रपटाचे निर्माते नीरज पांडे यांना सुनावले. चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती आणण्याच्या याचिकेवर सुनावणी करतांना न्यायालयाने चित्रपटाच्या नावाला तीव्र आक्षेप नोंदवला. हा चित्रपट ओटीटी मंच (ॲपच्या माध्यमांतून चित्रपट, मालिका आधी कार्यक्रम पहाणे) ‘नेटफ्लिक्स’वर प्रदर्शित होणार होता.
न्यायालयाने चित्रपट निर्मात्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले असून ‘घूसखोर पंडित’ हे शीर्षक समाजातील कोणत्याही वर्गाला कमी लेखत नाही, याबाबत स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. तसेच माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ यांनाही नोटीस बजावली आहे. पुढील सुनावणी १९ फेब्रुवारी या दिवशी होणार आहे.
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
‘खालिद के शिवाजी’ हिंदुविरोधी चित्रपट ‘ओटीटी’वर प्रदर्शित !