शिक्षक झाकीर बाशा शेख याच्यावर ३० अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप !

शेख याला अटक

आरोपी झाकीर बाशा शेख (डावीकडे)

अन्नमय्या (आंध्रप्रदेश) – जिल्ह्यातील तारिगोंडा येथील जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेतील शिक्षक झाकीर बाशा शेख याच्यावर सुमारे ३० अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी गुर्रमकोंडा पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात तक्रार प्रविष्ट (दाखल) करण्यात आली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थ आणि पीडित मुलींचे पालक यांनी शाळेसमोर तीव्र निदर्शने केली होती. प्राथमिक चौकशीनंतर शिक्षण विभागाने झाकीर बाशा शेख याला तात्काळ निलंबित केले होते. (अशा वासनांध शिक्षकांना शाळेतून नुसते निलंबित न करता त्याला बडतर्फ करून कारागृहात डांबले पाहिजे, तरच भावी पिढीची हानी टळेल ! – संपादक) आरोपी शिक्षकाला अटक करून त्याची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

पीडित मुलींना या मानसिक धक्क्यातून सावरण्यासाठी जिल्हा प्रशासनाने त्यांना विशेष समुपदेशन (कौन्सेलिंग) देण्याची व्यवस्था केली आहे. आंध्रप्रदेश सरकारने या प्रकरणाची जलद गतीने सुनावणी करण्याचे आणि आरोपीला कठोर शिक्षा देण्याचे आश्वासन दिले आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या हस्तक्षेपामुळे या प्रकरणातील अन्वेषणाला अधिक गती मिळाली आहे.

संपादकीय भूमिका

अशांच्या विरोधात जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक !