व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा मुसलमानांवर गोळीबार करत असल्याचे दाखवले

आसाम भाजपच्या ‘एक्स’ खात्यावरून पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडिओमुळे वाद

गौहत्ती (आसाम) – आसाम भाजपच्या अधिकृत ‘एक्स’ खात्यावर ७ फेब्रुवारी या दिवशी एक व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे. यात राज्याचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांच्याकडून रायफलीद्वारे मुसलमानांवर अगदी जवळून गोळीबार करण्यात येत असल्याचे दाखवण्यात आले आहे. याला ‘पॉईंट ब्लँक शूट’ (अगदी जवळून गोळीबार करणे) असे शीर्षक देण्यात आले आहे, तसेच आसामी भाषेत ‘परक्यांपासून मुक्त आसाम’, ‘कसलीही दया नाही’, ‘तुम्ही पाकिस्तानला का गेला नाहीत?’ आणि ‘बांगलादेशीयांसाठी क्षमा नाही’, असे लिखाणही आहे. मुसलमानांची प्रतीकात्मक चित्रे कृत्रिम बुद्धीमत्तेद्वारे (एआयद्वारे) सिद्ध केलेली असल्याचा दावा केला जात आहे. या चित्रांवर सरमा गोळीबार करतांना दाखवले आहेत. या व्हिडिओमुळे वाद निर्माण झाला आहे.