सामाजिक माध्यमातून राबवण्यात आली होती मोहीम !
मुंबई – कोरेगाव भीमा प्रकरणातील १० क्रमांकाचे आरोपी आणि शहरी नक्षलवादी अन् मानवी हक्क कार्यकर्ते प्रा. आनंद तेलतुंबडे ‘द सेल अँड द सोल – ए प्रिझन मेमॉयर’ (अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा गळा घोटण्यासाठी सरकार प्रायोजित कारागृहवास) या पुस्तकावर आधारित चर्चासत्र रहित करण्यात आले आहे. मुंबईतील काळा घोडा महोत्सवात ‘डेव्हिड ससून ग्रंथालया’त होणार्या चर्चासत्राचे नाव ‘इनकार्सरेटेड – टेल्स फ्रॉम बिहाईंड बार्स’ (कारागृहातील भिंतीआडच्या कथा) असे होते. पत्रकार आणि लेखिका नीता कोल्हटकर या पुस्तकाविषयी त्यांच्याशी संवाद साधणार होत्या. सूत्रसंचालन ‘स्क्रोल’ या वेब संकेतस्थळाचे संपादक नरेश फर्नांडिस करणार होते.
हे चर्चासत्र रहित करण्यासाठी सामाजिक माध्यमांतून माओवादाच्या विरोधात काम करणार्या काही संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मोहीम राबवली होती. मुंबई पोलिसांनी या चर्चासत्रावर आक्षेप घेतल्याने ते ऐनवेळी आयोजकांना रहित करावे लागले. त्या संदर्भातील पत्र आयोजकांनी या चर्चासत्रात सहभागी वक्त्यांना पाठवले. तेलतुंबडे यांच्या ३१ महिन्यांच्या कारागृहातील अनुभवांवर हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात भारतातील कारागृह व्यवस्थेतील क्रूर वास्तव आणि कारागृहातील बंदीवानांची दुर्दशा त्यांनी लिहिली आहे.
सुप्रसिद्ध काळा घोडा महोत्सवाचे हे २६ वे वर्ष असून महापालिका, पर्यटन विभाग आणि युनेस्को यांच्या सहभागाने या कार्यक्रमाचे आयोजन होते. ‘अँटी टेरर फोरम’चे महाराष्ट्राचे अध्यक्ष तुषार दामगुडे यांनी या कार्यक्रमाशी संबंधित असलेल्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. विवेक विचार मंचचे राज्य संयोजक सागर शिंदे यांनी ‘या विरोधात समाजाने उभे रहावे’, असे म्हटले आहे.
‘या पुस्तकावर अनेक ठिकाणी चर्चा झाल्या. अनेक संशोधन पत्रिकांमध्ये परीक्षणे प्रसिद्ध झाली आहेत. या पुस्तकावर बंदी नाही. पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध आहे. तरी अशा पद्धतीने कार्यक्रम रहित करण्यास भाग पाडणे याचा अर्थ इथे कायद्याचे राज्य नाही’, अशी प्रतिक्रिया प्रा. तेलतुंबडे यांनी दिली.
संपादकीय भूमिकादेशाविरोधात काम केल्याचे गंभीर आरोप ज्यांच्यावर आहेत, त्यांची चर्चासत्रे ठेवलीच कशी जातात ? अशा समाजद्रोही लोकांची चर्चासत्रे आयोजित करणार्या आणि नक्षलवादाचे उदात्तीकरण करणार्यांचीही चौकशी व्हायला हवी ! |

ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !