रुग्णालयात लोखंडी साखळ्यांनी बांधून छळ

जुनागड (गुजरात) – पाकिस्तानी कारागृहे भारतीय मासेमारांसाठी मृत्यूचे सापळे बनले आहेत. पाकिस्तानातील कराची येथील कारागृहात बंदीवान असलेल्या भारतीय मासेमाराचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. भागाभाई बामनिया असे या मासेमाराचे नाव असून ते गुजरातमधील गिर सोमनाथ जिल्ह्यातील चिखली गावाचे रहिवासी होते. भागाभाई बामनिया कारागृहात अचानक आजारी पडले होते. त्यानंतर त्यांना उपचारासाठी कराचीतील रुग्णालयात भरती करण्यात आले होते. तेथे नुकतेच त्यांचे निधन झाले. पाकिस्तानी रुग्णालयात भारतीय रुग्णांना जनावरांपेक्षाही वाईट वागणूक दिली जाते. याविषयीचा एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे, ज्यामध्ये कराची रुग्णालयात उपचारासाठी नेलेल्या भागाभाई यांना लोखंडी साखळ्यांनी बांधण्यात आल्याचे दिसून येते. या व्हिडिओनंतर भागाभाई यांच्या कुटुंबांने पाकिस्तानविरुद्ध प्रचंड संताप व्यक्त केला आहे.
मृत भागाभाई बामनिया यांचे १८ फेब्रुवारी २०२२ या दिवशी पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणांनी त्यांच्या ‘बुराक’ या नौकेसह अपहरण केले होते. ‘समुद्र सुरक्षा श्रमिक संघा’चे अध्यक्ष बाळूभाई सोच यांनी पाकिस्तानी अधिकार्यांवर अमानवी वागणूक आणि मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याचा थेट आरोप केला आहे. पाकिस्तानी सुरक्षायंत्रणांनी सीमेवरून अपहरण केलेले जवळजवळ २०० भारतीय मासेमार अजूनही पाकिस्तानी कारागृहात आहेत.
संपाकीदय भूमिकाभारतीय मासेमारांना छळण्याची ही काही पहिली घटना आहे. अशा पाकला जन्माची अद्दल घडवण्यासाठी भारत सरकार काय पावले उचलणार ? |
Suhail Arrested : श्रीराममंदिर बाँबने उडवून देण्याचा कट रचणार्या सुहेल याला कर्नाटकमधून अटक
Asim Munir Assassination Plan : इस्रायलची गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’ने रचला होता पाकचे सैन्यदलप्रमुख असीम मुनीर यांच्या हत्येचा कट !
पाकिस्तानची स्तुती करणार्या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांवर त्यांच्याच पक्षातील खासदार भडकले !
Indus Water Treaty Crisis : सिंधू जल वाटप करारावरून पाकने काश्मीरमधील सीमेवर तैनात केले ३५ ड्रोनविरोधी युनिट !
Mahrang Baloch : मानवाधिकारांच्या उल्लंघनाविरुद्ध आवाज उठवणार्या महरंग बलोच यांना पाकिस्तानकडून जन्मठेपेची शिक्षा !
Jaish Female Terrorist : जयपूर (राजस्थान) येथे हिंदु महिला ‘जैश-ए-महंमद’च्या संपर्कात !