नागपूर येथे कफ सिरप घेतल्याने ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू !

मृतांची संख्या २५ वर पोचली !

प्रतिकात्मक छायाचित्र

नागपूर – दूषित कोल्ड्रिफ कफ सिरपचे सेवन केल्याने उपचार घेत असलेल्या बालकाचा मृत्यू झाल्याने या प्रकरणातील मृतांची संख्या २५ वर पोचली आहे. नागपूरच्या एम्स रुग्णालयात गेल्या ४ महिन्यांपासून उपचार चालू असलेल्या हर्ष यदुवंशी (वय ४ वर्षे) या बालकावर ११७ दिवस उपचार चालू असतांना त्याचे निधन झाले. गेल्या वर्षी मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात कफ सिरप सेवनामुळे अनेक बालकांचे मृत्यू झाले होते. यानंतर आरोग्य मंत्रालयाने लहान मुलांना खोकल्याची औषधे देतांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

नागपूरच्या ‘एम्स’ रुग्णालयातील बाल अतीदक्षता विभागाच्या पथकाने सांगितले की, मूत्रपिंड निकामी होणे, न्यूमोनिया, सेप्टिसेमिया इत्यादी गुंतागुंतीवर उपचार केल्याचे आधुनिक वैद्यांनी सांगितले.