|

नवी देहली – अमेरिकेसमवेत करण्यात आलेला व्यापार करार लघु आणि मध्यम उद्योजक, औद्योगिक घटक, कुशल कामगार अन् उद्योग यांच्यासाठी नव्या संधी उपलब्ध करेल. प्रगत तंत्रज्ञानापर्यंत पोच सुलभ होईल. ‘मेक इन इंडिया फॉर द वर्ल्ड’ (जगासाठी भारतात उत्पादन), ‘डिझाइन इन इंडिया फॉर द वर्ल्ड’ (जगासाठी भारतात रचना) आणि ‘इनोव्हेट इन इंडिया फॉर द वर्ल्ड’ (जगासाठी भारतात नवोन्मेष) या उद्दिष्टांना गती मिळेल. यात खत आणि कृषी यांसारख्या संवेदनशील क्षेत्रांमध्ये भारताच्या हितांचे पूर्ण संरक्षण करण्यात आले आहे, अशी माहिती उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी लोकसभेत दिली. गोयल यांचे वक्तव्य चालू असतांना लोकसभेत विरोधकांकडून गदारोळ केला जात होता. तरीही राष्ट्रीय हितांना सर्वोच्च प्राधान्य देत चर्चा पूर्ण केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कृषी आणि दुग्धव्यवसाय पूर्णतः संरक्षित !
गोयल यांनी पुढे सांगितले की, मागील वर्षभरात दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये विविध पातळ्यांवर सविस्तर चर्चा झाली. दोन्ही बाजूंच्या महत्त्वाच्या हितांचा विचार करून संवेदनशील क्षेत्रांचे संरक्षण सुनिश्चित करण्यात आले. चर्चांच्या वेळी भारतीय बाजूने विशेषतः कृषी आणि दुग्धव्यवसाय यांसारख्या संवेदनशील क्षेत्रांतील हितांचे यशस्वी संरक्षण केले. १ वर्षाच्या चर्चेनंतर द्विपक्षीय व्यापार करारातील विविध क्षेत्रांना अंतिम स्वरूप देण्यात आले.
जेजुरीतील रसायनयुक्त भंडार्याच्या विक्रीविरुद्ध भाजप आमदार विक्रम पाचपुते आक्रमक !
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
डॉक्टरांनी ८ सहस्र रुपये घेऊन हाड जोडले; पण उर्वरित रक्कम न मिळाल्याने ते पुन्हा तोडल्याचा आरोप !
धोकादायक इमारतीमधील रहिवास बंद करून त्या स्वतःहून पाडाव्यात !
Gujrat Crackdown Illegals Bangladeshi : गुजरातमध्ये घुसखोरांविरुद्ध ‘ऑपरेशन डेल्टा हंट’ : २ दिवसांत ५०१ बांगलादेशी नागरिकांना अटक !