घटनेमागे षड्यंत्राचा संशय, इंजेक्शन देणार्याला अटक !

जोधपूर (राजस्थान) : येथील प्रसिद्ध युवा साध्वी प्रेम बाईसा यांचा २८ जानेवारीच्या सकाळी इंजेक्शन दिल्यानंतर ५ मिनिटांतच मृत्यू झाला. त्यांना सर्दी-खोकल्याचा त्रास होत असल्याने एका ‘कंपाऊंडर’ने (आधुनिक वैद्यांच्या साहाय्याकाने) त्यांना इंजेक्शन दिले होते. या प्रकरणी पोलिसांनी कंपाऊंडरला त्वरित अटक केली आहे, तसेच साध्वी रहात असलेला आश्रम बंद करून अन्वेषण चालू केले आहे. त्यांच्या शवविच्छेदनानंतर पोलिसांना अधिक माहिती मिळू शकेल.
साध्वी प्रेम बाईसा यांचे वडील, तसेच त्यांचे गुरु वीरम नाथ यांनी सांगितले की, काही काळापासून साध्वींना खोकला आणि सर्दी यांचा त्रास होता. त्यामुळे आश्रमात कंपाऊंडरला बोलावण्यात आले. तपासणीनंतर त्याने इंजेक्शन दिले. त्यानंतर अवघ्या ५ मिनिटांत साध्वींनी प्राण सोडले.
कोण होत्या साध्वी प्रेम बाईसा ?![]() साध्वी प्रेम बाईसा या पश्चिम राजस्थानमधील प्रसिद्ध कथावाचक होत्या. राज्याबाहेरही त्यांचे मोठे अनुयायी होते. त्या शहरासह विशेषतः ग्रामीण भागातून कथावाचनाच्या रूपात धर्मसेवा करत होत्या. इन्स्टाग्रामवर त्यांचे ७ लाख २८ सहस्रांहून अधिक अनुयायी आहेत. |
साध्वींच्या मृत्यूनंतर त्यांच्या इन्स्टाग्राम खात्यावरून ‘न्याय मिळावा’, असा संदेश प्रसारित !
या सगळ्यात साध्वींच्या मृत्यूनंतर काही घंट्यांनी त्यांच्या ‘इन्स्टाग्राम’ खात्यावरून एक संदेश प्रसारित केला गेला. त्यामध्ये न्याय देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे या प्रकरणाचे गुढ वाढले आहे.
|
वडिलांनी मान्य केले की, साध्वींच्या सांगण्यावरूनच एका सहकारी गुरु महाराजांनी त्यांच्या भ्रमणभाषवरून तो संदेश प्रसारित केला होता. साध्वींनी अंतिम क्षणी न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती. तसेच साध्वींचा पूर्वीच्या एका प्रकरणाचा जुना व्हिडिओ प्रसारित झाला असून त्याचा त्यांच्या मृत्यूशी संबंध असल्याची चर्चा आहे.

आतंकवाद्यांच्या पाठीराख्यांना सिंधु नदीचे पाणी मिळणार नाही ! : Defence Minister Rajnath Singh
UP Bulldozer Action : श्री चामुंडा मंदिराच्या भूमीवरील धार्मिकस्थळाचे अतिक्रमण हटवले !
आता शत्रूची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट होणार !
बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे आमदार मदन मित्रा यांच्या निवासस्थानांवर ‘ईडी’ची धाड
Abhishek Banerjee’s Home Raid : बंगाल पोलिसांकडून मध्यरात्री अभिषेक बॅनर्जी यांच्या घरावर धाड
कर्नाटक : पैसे घेऊन विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले जात असल्याचे उघड !