जगाची दिशाभूल करणार्या पाकचा चेहरा उघड

इस्लामाबाद (पाकिस्तान) : पाकिस्तानतील न्यायालयाकडून शिक्षा ठोठावलेला लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख आतंकवादी हाफीज सईद उघडपणे फिरत असल्याचे समोर आले आहे. सईद कारागृहात आहे किंवा घरात स्थानबद्ध आहे, असा पाकिस्तान सरकारचा दावा एका व्हिडिओमुळे खोटा ठरला आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातून समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये हाफीज सईद बैठकींमध्ये सहभागी झाल्याचे आणि त्याच्या संघटनेच्या कमांडरांना हसतहसत भेटल्याचे दिसत आहे. संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेला आतंकवादी आणि भारतातील अनेक प्रकरणांत पसार असलेला सईद अशा प्रकारे पाकिस्तानमध्ये उघडपणे फिरत असल्याने पाकिस्तानच्या आतंकवादविरोधी दाव्यांविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Hafiz Saeed, chief of Lashkar-e-Taiba, roams free in Pakistan 🇵🇰 despite "convictions."
A new video from Punjab exposes the lie: Saeed attending meetings with Pak Army personnel, alongside LeT operatives Saifullah Kasuri & Nasr Javed, with police-style security.
A UN-designated… pic.twitter.com/Apq6ohwY5R
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 30, 2026
पंजाबमध्ये सक्रीय असल्याचा दावा
‘ओसिंट टीव्ही’ या वृत्तवाहिनीने सईदचा व्हिडिओ प्रसिद्ध करत दावा केला आहे की, तो मागील वर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये पंजाबमधील ओकारा येथे होता. तो ज्या आतंकवाद्यांना भेटला त्यामध्ये तोयबाचा उपप्रमुख सैफुल्लाह कसुरी आणि भरती कमांडर नस्र जावेद यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे पोलीस गणवेशातील व्यक्तींची त्याला सुरक्षा असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे.
🚨 Exclusive OSINT Report 🇵🇰👹:
According to Lashkar-e-Taiba sources, UN-designated terrorist and LeT chief Hafiz Saeed attended a meeting in Okara during Oct/Nov
The video shows Hafiz Saeed alongside LeT Deputy Chief 📍Saifullah Kasuri and recruitment commander 📍Nasr Javed. pic.twitter.com/6DA6lMpT5j
— OsintTV 📺 (@OsintTV) January 30, 2026
अनेक प्रकरणांत शिक्षा झाली असल्याचा सरकारी दावा
पाकिस्तान सरकारच्या म्हणण्यानुसार हाफीज सईद वर्ष २०१९ पासून कारागृहात आहे. आतंकवादाशी संबंधित विविध प्रकरणांत त्याला ५० वर्षांहून अधिक कालावधीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पाकिस्तान सरकार जगाला आणि संयुक्त राष्ट्रांना सांगते की, सईद पंजाबमधील एका कारागृहात बंद आहे. संयुक्त राष्ट्रे आणि आंतरराष्ट्रीय समुदाय सईद कारागृहात असल्याचे मानत असले, तरी अलीकडील काळात सातत्याने समोर येणार्या व्हिडिओत तो मोकाट फिरत असल्याचे दिसले आहे.
कारागृहात असूनही राजकीय हालचाली
अधिकृतपणे हाफीज सईद लाहोरमधील कोट लखपत केंद्रीय कारागृहात बंद असल्याचे सांगितले जाते; मात्र तो केवळ आतंकवादी कारवाया करत नाही, तर त्याचा राजकीय पक्ष चालवत असल्याचा आरोप आहे. त्याने राजकीय पक्ष स्थापन करून पाकिस्तानमध्ये वर्ष २०१८ मधील सार्वत्रिक निवडणूकही लढवली होती. सध्या त्याचा पक्ष कार्यरत असून त्याच्या कुटुंबातील सदस्य निवडणुकींमध्ये सक्रीय सहभाग घेत आहेत.
मुंबईवरील आक्रमणाचा मुख्य सूत्रधार
हाफीज सईद हा भारतातील पसार आतंकवाद्यांच्या सूचीमध्ये आहे. मुंबईवरील आक्रमणाचा तो मुख्य सूत्रधार आहे. पुलवामा आक्रमणासह इतर अनेक आतंकवादी कारवायांमध्ये त्याचा हात आहे. भारताने अनेक वेळा पाकिस्तानकडे हाफीज सईदच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आहे; मात्र पाकने ती प्रत्येक वेळी फेटाळून लावली आहे.
संपादकीय भूमिकासंयुक्त राष्ट्रे आता पाकवर कारवाई करणार का ? त्याला आतंकवादी देश घोषित करणार कि या घटनेकडे दुर्लक्ष करून पाकला पाठीशी घालणार ? |
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
राज्यातील पोलीस ठाण्यांच्या आवारात महिला समुपदेशन केंद्रे स्थापन करणार !
कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकर्यांना ‘राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी’च्या निकषांपलीकडे जाऊन आर्थिक साहाय्य देणार
‘महा-एआय मॉडेल’द्वारे माहिती-आधारित प्रशासन उभारण्याच्या दिशेने शासनाचे महत्त्वाचे पाऊल ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री