७ नव्या मंदिरांचे बांधकाम अंतिम टप्प्यात
अयोध्या (उत्तरप्रदेश) – येथील श्रीरामजन्मभूमी परिसराचा संपूर्ण विकास व्यापक आणि सर्वसमावेशक ‘धार्मिक संकुल’ म्हणून केला जात आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाने परिसरात ७ नवी मंदिरे उभारण्याची आणि ती भाविकांसाठी उघडण्याची योजना अंतिम केली आहे. या मंदिरांचे बांधकाम वेगाने चालू आहे. ही ७ मंदिरे रामायण काळातील प्रमुख व्यक्ती आणि ऋषी यांना अर्पण केली जाणार आहेत. यामध्ये महर्षि वाल्मीकि, महर्षि वसिष्ठ, महर्षि विश्वामित्र, महर्षि अगस्त्य, निषादराज, माता शबरी आणि देवी अहिल्या यांच्या मंदिरांचा समावेश आहे. या मंदिरांच्या माध्यमातून रामायणातील प्रत्येक प्रसंग आणि समाजातील प्रत्येक घटक यांना सन्मान देण्याचा प्रयत्न असल्याचे न्यासाने स्पष्ट केले आहे आहे. यामुळे भाविकांना रामायण दर्शनाचा अनुभव मिळणार आहे.
पूजाविधीसाठी नव्या पुजार्यांची भरती
या मंदिरांमध्ये नियमित पूजाविधी आणि दर्शन व्यवस्था चालू करण्यासाठी न्यासाने नव्या पुजार्यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीराममंदिर परिसरात लवकरच अनुमाने ५० नवे पुजारी नियुक्त केले जाणार आहेत. उपमंदिरे चालू होण्यापूर्वीच ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याची सिद्धता असून सर्व धार्मिक विधी सुरळीतपणे पार पडावेत, हा उद्देश आहे. सध्या राममंदिरात २० पुजारी कार्यरत आहेत. नवी उपमंदिरे झाल्यानंतर पूजेसाठी ३ पाळ्यांमध्ये ४२ पुजार्यांची आवश्यकता भासणार आहे. याखेरीज सप्त मंडपम् आणि कुबेर टीला परिसरासाठी ८ अतिरिक्त पुजारी नियुक्त केले जाणार आहेत.

स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक