
पंढरपूर – वसंतपंचमीच्या शुभ मुहूर्तावर (२३ जानेवारीला) श्री विठ्ठल आणि श्री रुक्मिणीमातेचा विवाह सोहळा परंपरेनुसार ‘श्री विठ्ठल सभा मंडप’ येथे भावपूर्ण वातावरणात पार पडला. दुपारी १२ वाजता श्री विठ्ठल आणि श्री रुक्मिणीमातेची अलंकाराने सजवलेली उत्सवमूर्ती श्री विठ्ठल सभामंडपातील फुलांनी सजवण्यात आलेल्या मंडपात आणण्यात आली. दोन्ही देवतांना मुंडावळ्या बांधण्यात आल्या होत्या. यानंतर अंतरपाट धरले आणि मंदिरे समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मंगलाष्टके म्हटली. मंगलाष्टके झाल्यावर उपस्थित भाविकांनी विवाह सोहळा साजरा केला.

विवाह सोहळ्याच्या निमित्ताने श्री विठ्ठलाला शुभ्रवस्त्र, तसेच श्री रुक्मिणीमातेस मोत्याचे दागिने, नथ आणि अलंकार परिधान करण्यात आले होते. श्री रुक्मिणीमातेच्या गर्भगृहातून श्री विठ्ठलाकडे गुलाल नेण्यात आला. तिथे गुलालाची उधळण केल्यानंतर श्री विठ्ठलाचा गुलाल रुक्मिणीमातेकडे नेण्यात आला. तिथेही गुलालाची उधळण करण्यात आली. या वेळी मंदिरे समितीच्या वतीने संत तुकारामभवन आणि विठ्ठल-रुक्मिणी भक्तनिवास येथे भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. विवाह सोहळा पार पडल्यानंतर भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला.
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
परभणी येथील संत कालिदास महाराज यांचे देहावसान
५ जणांना कापूरबावडी पोलिसांकडून समजपत्र !
नाशिकच्या जलसंवर्धन योजनेची राष्ट्रीय स्तरावर नोंद !
ठाणे येथे २५ वर्षांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा; संतप्त नागरिकांचा महानगरपालिकेवर मोर्चा