मुंबईच्या महापौरपदी खुल्या प्रवर्गातील महिला !

मुंबई – राज्यातील २९ महानगरपालिकांतील महापौरपदांच्या आरक्षणाची सोडत २२ जानेवारी या दिवशी मंत्रालयात घोषित करण्यात आली. अनुसूचित जमाती १, अनुसूचित जाती ३, इतर मागासवर्गासाठी ८ आणि सर्वसाधारण १७, अशा प्रकारे आरक्षण देण्यात आले. यामध्ये राज्यातील सर्वांत मोठी महानगरपालिका असलेल्या मुंबईसह पुणे, नागपूर आणि नाशिक या मोठ्या महानगरपालिकांमध्ये खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण आले आहे.

यांतील ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव असल्यामुळे प्रथम प्रत्येक वर्गातील ५० टक्के जागांसाठी महिला आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या. राज्य नगरविकासमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत आरक्षणाची सोडत काढण्यात आली. या वेळी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
१५ महानगरपालिकांमध्ये महिला महापौर !
मुंबई – राज्यातील २९ पैकी अनुसूचित जाती प्रवर्गाच्या ३ जागांपैकी २ जागा अनुसूचित जातींमधील महिलांसाठी, मागास प्रवर्गातील ८ पदांपैकी ४ पदे मागास प्रवर्गातील महिलांसाठी, तर उर्वरित १७ सर्वसाधारण जागांमध्ये ९ जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. अशा प्रकारे २९ पैकी १५ महानगरपालिकांमध्ये महिला महापौर होणार आहेत.
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !