वर्ष १९८४ मध्ये झालेले शीख दंगलीचे प्रकरण

नवी देहली – वर्ष १९८४ मध्ये झालेल्या शीख दंगलीशी संबंधित जनकपुरी आणि विकासपुरी हिंसाचार प्रकरणात देहलीतील न्यायालयाने काँग्रेसचे नेते सज्जन कुमार यांची निर्दोष मुक्तता केली आहे. या हिंसाचारात २ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी निकाल देतांना न्यायालयाने स्पष्ट केले की, या प्रकरणात पुरेसे पुरावे आढळले नाहीत. सज्जन कुमार यांच्या विरोधात आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत. त्यामुळे सज्जन कुमार यांना सर्व आरोपांतून मुक्त करण्यात आले आहे. असे असले, तरी शीख दंगलीच्या अंतर्गत सरस्वती विहार येथील शिखांच्या हत्येच्या प्रकरणात त्यांना याआधी आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यामुळे ते सध्या कारागृहात आहेत.
1984 Sikh Riots Case
Congress leader Sajjan Kumar acquitted by a Delhi Court – Shocks riot victims’ familiesA verdict in a deeply sensitive case, after 42 long years. Is justice still justice when it comes this late? ⚖️⏳
Note: Despite this acquittal, Kumar remains in jail,… https://t.co/hpRMd9PHDR pic.twitter.com/SWzDq4THRj
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 22, 2026
१९८४ च्या दंगलीच्या प्रकरणी देशभरात अनेक गुन्हे नोंदवले गेले होते. जनकपुरी आणि विकासपुरी हिंसाचार प्रकरणात सज्जन कुमार यांचे नाव समोर आले होते; मात्र आता न्यायालयाने त्यांची सर्व आरोपांतून मुक्तता केली आहे.
संपादकीय भूमिकाएका संवेदनशील प्रकरणाचा ४२ वर्षांनी निकाल देणारी न्याययंत्रणा ! |
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !