पादचार्यांचे आरोग्य आणि सुरक्षा धोक्यात !

पिंपळे गुरव (जिल्हा पुणे) – येथील ६० फुटी रोडवरील पदपथावर गेल्या अनेक दिवसांपासून उशांची आच्छादने आणि प्लास्टिक कचरा यांचे मोठे ढिगारे साचले आहेत. यामुळे पादचार्यांना जीव मुठीत धरून मुख्य रस्त्यावरून चालावे लागत असून अपघाताची टांगती तलवार निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे जवळच स्मशानभूमी असल्याने अंत्यविधीसाठी येणार्या नागरिकांची येथे मोठी वर्दळ असते, तरीही पालिकेच्या आरोग्य विभागाने या गंभीर समस्येकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. उन्हामुळे हा कचरा सडत असून परिसरात दुर्गंधी आणि संसर्गजन्य आजार यांचा धोका वाढला आहे.
प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ‘स्मार्ट सिटी’ची केवळ जाहिरात करणार्या प्रशासनाला पदपथावरील हा कचरा दिसत नाही का ? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. पदपथ हा कचर्यासाठी नसून चालण्यासाठी आहे, याचे भान आरोग्य विभागाने ठेवावे आणि तातडीने हा राडारोडा हटवून पदपथ मोकळा करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. पदपथ मोकळा न केल्यास आंदोलनाची चेतावणीही नागरिकांनी दिली आहे.
‘ड’ क्षेत्रीय कार्यालय, महापालिकेचे मुख्य आरोग्य निरीक्षक शंकर घाटे यांनी सांगितले की, जागामालकांना कचरा उचलून घेण्याविषयी सूचना देण्यात आलेल्या आहेत. दिलेल्या सूचनांचा २ दिवसांत पाठपुरावा करण्यात येईल. या कालावधीत जागामालकांनी कचरा उचलून न घेतल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
पर्यायी जागा सुचवण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश
अनुमतीविना म्हादई वन्यजीव अभयारण्यात प्रवेश करणार्या ५ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा नोंद
‘स्मार्ट मीटर’विषयीच्या अफवांवर विश्वास न ठेवता ग्राहकांनी सहकार्य करावे ! – महावितरणचे आवाहन
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !
पुणे येथे अधिवक्ता एस्.के. जैन यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ !
पानशेत (पुणे) पूरग्रस्त सोसाट्यांचे प्रश्न ६५ वर्षांनंतरही प्रलंबित !