रमत गमत चालणे म्हणजे व्यायाम नव्हे !
श्रम केल्यानेच शरिराची ताण सहन करण्याची क्षमता वाढते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार थोडेफार श्रम होतील, अशा पद्धतीने व्यायाम करायला हवा. – वैद्य मेघराज माधव पराडकर
श्रम केल्यानेच शरिराची ताण सहन करण्याची क्षमता वाढते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार थोडेफार श्रम होतील, अशा पद्धतीने व्यायाम करायला हवा. – वैद्य मेघराज माधव पराडकर
या औषधाच्या २ ते ४ गोळ्यांची बारीक पूड करून ती २ चमचे तुपात नीट मिसळून चाटून खावी. तूप उपलब्ध न झाल्यास गोळ्या चावून खाव्यात – वैद्य मेघराज माधव पराडकर
सुकामेवा खर्चिक वाटत असल्यास गूळ-शेंगदाणे, तीळ-गूळ, भाजलेले फुटाणे, डिंकाचे किंवा मेथीचे लाडू यांसारखे पौष्टिक पदार्थ भुकेच्या प्रमाणात खावेत. पोषणमूल्यहीन आणि आरोग्य बिघडवणारे पदार्थ खाण्यापेक्षा पौष्टिक, सात्त्विक आणि नैसर्गिक पदार्थ खावेत.
केवळ चालणे, केवळ सूर्यनमस्कार किंवा केवळ प्राणायाम न करता स्वतःच्या क्षमतेनुसार प्रत्येक प्रकारातील व्यायाम थोडा थोडा करावा. असे नियमित केल्याने व्यायामाचा शरिरावर सुपरिणाम दिसायला लागतो.
येथे प्राथमिक उपचार दिले आहेत. ७ दिवसांत गुण न आल्यास वैद्यांचा समादेश (सल्ला) घ्यावा.
शरीर निरोगी ठेवण्याचा सर्वाेत्तम मार्ग म्हणजे ‘व्यायाम करणे’. आहाराचे नियम न पाळल्याने वातादी दोष असंतुलित झाले, तरी नियमित व्यायाम केल्याने ते पुन्हा संतुलित होण्यास साहाय्य होते.
संस्कृतमध्ये उपवास या शब्दाची फोड ‘उप + वास’, अशी आहे. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे रहाणे; म्हणून ‘उपवास’ म्हणजे ईश्वराच्या जवळ रहाणे किंवा ईश्वराच्या सतत अनुसंधानात रहाणे.
हाता-पायांवर पुरळ येणे, ताप आणि ताप गेल्यावर तोंडात वेदनादायक फोड येणे, ही लक्षणे असलेल्या साथीच्या रोगाला आधुनिक वैद्यकशास्त्रात ‘हँड, फूट अँड माऊथ’ रोग म्हणतात. या रोगावरील आयुर्वेदातील प्राथमिक उपचार येथे देत आहोत.
‘दिवसातून केवळ २ वेळा आहार घेणे’, हे आदर्श आहे. यामुळे शरीर निरोगी रहाते. हे शक्य नसल्यास जास्तीतजास्त ३ वेळा आहार घ्यावा. सकाळी शौचाला साफ झालेले असणे, शरीर हलके असणे आणि चांगली भूक लागलेली असणे, ही लक्षणे निर्माण झाल्यावरच सकाळचा अल्पाहार करावा.
व्यायामामध्ये सातत्य ठेवण्यासाठी कृतीच्या स्तरावरील एक सोपा उपाय म्हणजे ‘५ मिनिटांचा नियम’ वापरणे. ‘कोणतीही कृती अगदीच न करण्यापेक्षा ५ मिनिटे करूया; म्हणून आरंभ करणे’, म्हणजे ‘५ मिनिटांचा नियम वापरणे’.