पावसाळ्यानंतर चालू होणार्‍या शरद ऋतूमध्ये उपयुक्त सनातनची आयुर्वेदीय औषधे

या ऋतूमध्ये होणार्‍या नेहमीच्या विकारांवर उपयुक्त सनातनची आयुर्वेदीय औषधे इथे देत आहोत – वैद्य मेघराज माधव पराडकर

व्यायाम कधी करावा ?

जेवण झाल्यावर पोट हलके होईपर्यंत, म्हणजे साधारण ३ घंट्यांपर्यंत व्यायाम करू नये. व्यायामानंतर न्यूनतम १५ मिनिटांपर्यंत काही खाऊ-पिऊ नये.’ – वैद्य मेघराज माधव पराडकर

जेवण जास्त झाल्याने होणार्‍या अपचनावर आयुर्वेदातील प्राथमिक उपचार

काही वेळा (उदा. सणासुदीच्या दिवशी) जास्त जेवल्याने पोट जड होऊन अपचनाची शंका येऊ लागते. अशा वेळी ‘लशुनादी वटी’ या औषधाच्या १ – २ गोळ्या चघळून खाव्यात.

केवळ ‘आयुर्वेदातील औषधे खाणे’ म्हणजे आयुर्वेदानुसार आचरण नव्हे !

स्वतःच्या मनाने पुष्कळ काळ एखादे औषध घेत रहाणे चुकीचे आहे. निरोगी रहाण्यासाठी आयुर्वेदातील औषधे नियमित खाणे नव्हे, तर केवळ पाचच मूलभूत पथ्ये पाळणे आवश्यक असते.

चाळिशीनंतर गुडघे दुखू नयेत, यासाठी गुडघ्यांना नियमित तेल लावा !

कोणतेही खाद्य तेल किंवा औषधी तेल वापरल्यास चालते. रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्यावर अंघोळीपूर्वी तेल लावावे. गुडघ्यांना लावलेले तेल न्यूनतम ३० मिनिटे रहायला हवे. नंतर धुतल्यास चालते – वैद्य मेघराज माधव पराडकर

शिस्तबद्धता आणि आयुर्वेदानुसार जीवन जगणारे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणारे वैद्य मेघराज माधव पराडकर !

श्रावण कृष्ण दशमी, म्हणजेच २१.८.२०२२ या दिवशी वैद्य मेघराज पराडकर यांचा वाढदिवस झाला. त्या निमित्ताने सहसाधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

मोकळेपणाने बोलणे हे एक मोठे औषध !

स्वभावदोषांमुळे बर्‍याच जणांना मोकळेपणाने बोलता येत नाही. काहींच्या मनामध्ये वर्षानुवर्षे पूर्वीचे प्रसंग आणि त्यांसंबंधीच्या भावना साठून राहिलेल्या असतात. मनामध्ये कोणत्याही प्रकारचे विचार साठून राहिले की, त्याचे पडसाद शरिरावर उमटतात आणि निरनिराळे शारीरिक त्रास चालू होतात.

अनावश्यक पथ्ये टाळा !

आरोग्यासंबंधीची मूलभूत पथ्यांचे प्रतिदिन नेमाने आचरण केले, तर आरोग्य एवढे चांगले रहाते की, जेवणाखाण्याच्या पथ्यांची, म्हणजे ‘पोळीऐवजी भाकरी हवी, भाताऐवजी पोळीच हवी, वाटाणा नको, वांगे नको, बटाटा नको…’, अशा पथ्यांची आवश्यकताच रहात नाही !

मूत्रमार्गाच्या जळजळीवर आयुर्वेदातील प्राथमिक उपचार

‘चहाचा पाव चमचा सनातन उशीर (वाळा) चूर्ण दिवसातून ४ वेळा अर्धी वाटी पाण्यात मिसळून प्यावे. ७ दिवसांत गुण न आल्यास वैद्यांचा समादेश (सल्ला) घ्यावा.’ – वैद्य मेघराज माधव पराडकर