भावभेट, ही चैतन्याची भेट ।

‘एकदा सौ. शालिनी प्रकाश मराठे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ७४ वर्षे) यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. त्या वेळी त्यांना झालेला आनंद आणि मिळालेली शांती त्यांनी पुढील कवितेत वर्णन केली आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७९ व्या जन्मोत्सवाच्या दिवशी साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

२.५.२०२१ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ७९ वा जन्मोत्सवानिमित्तचा ‘ऑनलाईन’ कार्यक्रम दाखवण्यात येणार असल्याचे मला समजले. त्या वेळी साक्षात् प.पू. गुरुमाऊलीचे दर्शन घेण्याची संधी मिळणार असल्याने मला आनंद होत होता.

यजमानांच्या आजारपणात यवतमाळ येथील श्रीमती धनश्री देशपांडे यांनी सनातनचे धर्मप्रचारक संत पू. अशोक पात्रीकर यांच्या माध्यमातून वेळोवेळी अनुभवलेली श्री गुरूंची कृपा !

९ मे २०२२ या दिवशी कै. रवींद्र देशपांडे वर्षश्राद्ध झाले. त्यानिमित्त कै. रवींद्र यांच्या आजारपणात त्यांच्या पत्नीने अनुभवलेली गुरुकृपा पाहुया.

ग्रंथलिखाणाचे अद्वितीय कार्य करणारे एकमेव परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !

८ मे २०२२ या दिवशीच्या लेखात ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ग्रंथांविषयी असणारा भाव’ आणि ‘ग्रंथसेवेच्या संदर्भात परात्पर गुरु डॉक्टरांचे घडलेले गुणदर्शन’ या पैलूंविषयी पाहिले . आज या लेखाचा पुढील भाग पाहूया.

साधकांनो, दास्यभावाचे प्रतीक असलेल्या रामभक्त हनुमानाप्रमाणे अंतरात सेवकभाव निर्माण करून स्वतःतील अहंचे निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न करा !

सर्व साधकांनी स्वतःत हनुमानाप्रमाणे सेवकभाव (दास्यभाव) निर्माण होण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यामुळे त्यांच्यात नम्रता, लीनता, गुरुनिष्ठा, गुरूंचे मन जिंकण्याची आंतरिक तळमळ आदी गुण वृद्धींगत होऊन अहंचे निर्मूलन होऊ लागेल आणि साधकांसाठी ईश्वरप्राप्तीचा मार्ग सुकर होईल !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७९ व्या जन्मोत्सवाच्या दिवशी देवगड (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील साधकांना आलेल्या अनुभूती

देवपूजा झाल्यावर आरती करण्यापूर्वी माझ्या पत्नीने (सौ. मीनाक्षी यांनी) भावप्रयोग सांगितला. तेव्हा मला ‘आश्रमात (घरी) सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉ. आठवले, प.पू. रामानंद महाराज, प.पू. पटेलबाबा, प.पू. दास महाराज आणि प.पू. परूळेकर महाराज यांचे आगमन झाले’, असे जाणवले.

एस्.एस्.आर्.एफ.चे पू. देयान ग्लेश्चिच यांना श्री नारायणाकडून मिळालेले ज्ञान आणि त्या संदर्भात त्यांना आलेली अनुभूती

‘अध्यात्माचे ज्ञान नसतांनाही साधना समजणे अन् ती चालू रहाणे’, ही केवळ गुरुकृपा असल्याविषयी पू. देयान ग्लेश्चिच यांना सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान !

यजमानांच्या आजारपणात यवतमाळ येथील साधिका सौ. सुनंदा हरणे आणि विदर्भ प्रभागाचे धर्मप्रचारक संत पू. अशोक पात्रीकर यांच्या माध्यमातून वेळोवेळी अनुभवलेली श्री गुरूंची कृपा !

यजमानांच्या आजारपणात यवतमाळ येथील साधिका श्रीमती धनश्री देशपांडे यांनी पू. अशोक पात्रीकर आणि सौ. सुनंदा हरणे यांच्या माध्यमातून वेळोवेळी अनुभवलेली श्री गुरूंची कृपा !

‘गुरुकृपायोगा’नुसार साधनेमधील पहिला टप्पा केवळ ‘स्वभावदोष-निर्मूलन’ नसून ‘स्वभावदोष-निर्मूलन आणि गुण-संवर्धन’ असा आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

साधकांनीही स्वभावदोष-निर्मूलनासह गुण-संवर्धन प्रक्रियाही नियमित राबवावी; कारण गुण असल्याविना साधना करता येत नाही. गुणांमुळे मनोबल वाढते. गुणवृद्धी झाली की, ‘साधना करूनही प्रगती का होत नाही’, अशा प्रकारचे विचार किंवा या विचारांनी येणारी निराशाही येत नाही.