१. श्री. शेखर चंद्रकांत इचलकरंजीकर (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ७६ वर्षे)
१ अ. २.५.२०२१ या दिवशी सकाळी उठल्यापासून माझा सातत्याने ‘श्री गुरवे नमः ।’ हा नामजप होत होता आणि त्या वेळी माझी भावजागृती होत होती.
१ आ. घरात सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉ. आठवले आणि अन्य संत यांचे आगमन झाल्याचे जाणवून दिवसभर त्यांचे अस्तित्व जाणवणे : देवपूजा झाल्यावर आरती करण्यापूर्वी माझ्या पत्नीने (सौ. मीनाक्षी यांनी) भावप्रयोग सांगितला. तेव्हा मला ‘आश्रमात (घरी) सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉ. आठवले, प.पू. रामानंद महाराज, प.पू. पटेलबाबा, प.पू. दास महाराज आणि प.पू. परूळेकर महाराज यांचे आगमन झाले’, असे जाणवले. मला नंतरही दिवसभर या सर्वांचे अस्तित्व जाणवत होते.
१ इ. जन्मोत्सवानिमित्तचा ‘ऑनलाईन’ कार्यक्रम पहातांना आलेल्या अनुभूती
१. माझी सातत्याने भावजागृती होत होती.
२. ‘परात्पर गुरु डॉक्टर, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याकडून माझ्याकडे काहीतरी प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवत होते. ‘ते काय होते ?’, हे माझ्या लक्षात आले नाही.
३. मला माझे शरीर बिंदूस्वरूप झाल्याचे जाणवले.
४. माझे मन निर्विचार झाले होते. माझ्याकडून दिवसभर कृतज्ञता व्यक्त होत होती आणि मी शरणागतभावात असल्याचे मला जाणवत होते.’
२. सौ. मीनाक्षी शेखर इचलकरंजीकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ६८ वर्षे)
अ. ‘आज माझ्या गुरूंचा वाढदिवस आहे’, या विचाराने मला पुष्कळ आनंद होत होता.
आ. माझा नामजप सतत होत होता आणि त्या वेळी माझा भाव जागृत होत होता.
इ. माझ्यातील स्वभावदोष दूर होण्यासाठी माझ्याकडून परात्पर गुरु डॉक्टरांना आर्ततेने प्रार्थना होत होत्या. माझ्याकडून श्री गुरुचरणी अखंड कृतज्ञता व्यक्त होत होती.
ई. सकाळपासून मला ‘परात्पर गुरु डॉक्टर माझ्या हृदयात सिंहासनावर बसले आहेत आणि ते सतत हसत आहेत’, असे दिसत होते.
उ. देवपूजा झाल्यानंतर सद्गुरूंच्या आरतीच्या वेळी माझे मन निर्विचार झाले होते.
ऊ. जन्मोत्सवानिमित्तचा ‘ऑनलाईन’ कार्यक्रम पहातांना मी भावावस्थेत होते. माझी ती स्थिती रात्रीपर्यंत टिकून होती. ‘त्यातून बाहेर पडू नये’, असे मला वाटत होते.
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : ४.५.२०२१)
|