चिरंतन आनंदप्राप्तीसाठी साधनेला पर्याय नाही !

‘देवावर आणि साधनेवर विश्‍वास नसला, तरी चिरंतन आनंद प्रत्येकालाच हवा असतो. तो केवळ साधनेने मिळतो. एकदा हे लक्षात आले की, साधनेला पर्याय नसल्याने मानव साधनेकडे वळतो.’

‘सर्वधर्मसमभाव’ म्हणणार्‍यांचा फोलपणा !

‘सर्वधर्मसमभाव’ म्हणणार्‍यांचा फोलपणा !

 ‘ज्यांनी सर्व धर्मांचा अभ्यास काय; पण वाचनही केले नाही, तेच ‘सर्वधर्मसमभाव’ म्हणतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

संतांनी समष्टी प्रसारकार्य करण्यामागील कारण !

‘आधीच्या युगांत प्रजा सात्त्विक असल्याने ऋषींना समष्टी प्रसारकार्य करावे लागायचे नाही. आता कलियुगात बहुतेक साधना करत नसल्याने संतांना समष्टी प्रसारकार्य करावे लागते !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

ईश्‍वरप्राप्तीसाठी आयुष्य द्यायला नको का ?

ईश्‍वरप्राप्तीसाठी आयुष्य द्यायला नको का ?

‘नोकरीत थोडासा पगार मिळावा; म्हणून ७ – ८ घंटे नोकरी करावी लागते, तर सर्वज्ञ, सर्वव्यापी आणि सर्व सामर्थ्यवान ईश्‍वराच्या प्राप्तीसाठी आयुष्य द्यायला नको का ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले               

देश रसातळाला जाण्यामागील कारण !

‘प्रथम मोगल, नंतर इंग्रज आणि आता राष्ट्रप्रेम नसलेले विविध राजकीय पक्ष यांच्यामुळे देश रसातळाला गेला आहे.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले    

‘साधना’ हीच खरी लस !

‘साधना’ हीच खरी लस !

‘एखादा रोग होऊ नये; म्हणून लसीकरण (व्हॅक्सिनेशन) करतो, तसेच तिसर्‍या महायुद्धाच्या काळात वाचण्यासाठी साधना हीच लस आहे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले                

सर्व समस्यांवर एकच उत्तर : हिंदु राष्ट्राची स्थापना !

‘सर्व रोगांना एकच औषध किंवा सर्व दाव्यांना एकच कायदा नसतो; पण राष्ट्र आणि धर्म यांच्या सर्व समस्यांना एकच उत्तर आहे अन् ते म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी साधनेविषयी केलेले अमूल्य मार्गदर्शन !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी साधनेविषयी केलेले अमूल्य मार्गदर्शन !

‘कुठे आजची मुले, तर कुठे वयाच्या ११ व्या वर्षी आत्मज्योतिज्ञान प्राप्त करणारे शंकराचार्य !’

राजकीय नेते आणि भक्त यांच्यातील भेद !

‘राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते कुणीही पैसे किंवा पद दिले, तर दुसर्‍या पक्षात जातात. याउलट भक्त देवाचा पक्ष सोडून, देवाच्या चरणांशी असलेली जागा सोडून दुसरीकडे कुठेही जात नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले    

साम्यवादामुळे झालेली हिंदूंची केविलवाणी अवस्था !

साम्यवादामुळे झालेली हिंदूंची केविलवाणी अवस्था !

‘मुसलमान साम्यवादी होत नाहीत, तर देवाला न मानणारे हिंदू साम्यवादी होतात. त्यामुळे त्यांना देवाचा आशीर्वाद मिळत नाही. साम्यवादी झालेले हिंदू बंगाल आणि केरळ येथे अधिक प्रमाणात असल्याने तेथील हिंदूंची अवस्था केविलवाणी झाली आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले