कीर्तनकार आणि गुरु यांच्यातील भेद !

‘कीर्तनकार आणि प्रवचनकार तात्त्विक माहिती सांगतात, तर खरे गुरु प्रायोगिक कृती करवून घेऊन शिष्याची प्रगती करतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

हिंदूंनो, साधनेस आरंभ करा !

हिंदूंनो, साधनेस आरंभ करा !

‘आपल्याला देवाचे साहाय्य का मिळत नाही ?’, याचा हिंदूंनी विचार केला पाहिजे आणि साहाय्य मिळण्यासाठी साधनेला आरंभ केला पाहिजे.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

व्यक्तीस्वातंत्र्य वाल्यांचे अज्ञान !

‘व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली आपल्या मनाप्रमाणे वागणारे वैद्यकीय, न्यायालयीन इत्यादी एकाही क्षेत्रात आपल्या मनाप्रमाणे वागत नाहीत. केवळ आध्यात्मिक परंपरांसंदर्भात मनाप्रमाणे वागतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

‘ऋषी-मुनींनी सांगितलेले चुकीचे कसे ?

‘ऋषी-मुनींनी सांगितलेले चुकीचे कसे ?

‘ऋषी-मुनींनी सांगितलेले चुकीचे कसे ? हे सांगण्याचा प्रयत्न करणारे तथाकथित विद्वान, हे लक्षात घेत नाहीत की, ऋषी-मुनींनी सांगितलेले सत्य चिरंतन आहे.

खरे सुख

खरे सुख

‘खरे सुख केवळ साधनेनेच मिळते, भ्रष्टाचाराने मिळवलेल्या पैशांनी नाही !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

साधना करण्याची अत्यावश्यकता !

‘अडचणीच्या वेळी साहाय्य व्हावे; म्हणून आपण अधिकोषात (बँकेत) पैसे ठेवतो. त्याचप्रमाणे संकटाच्या वेळी साहाय्य व्हावे; म्हणून साधनेचा साठा आपल्या संग्रहात असणे आवश्यक आहे. ’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले        

हिंदूंनो, व्यापक व्हा !

हिंदूंनो, व्यापक व्हा !

‘हिंदूंनो, स्वतःसमवेत राष्ट्र आणि धर्म यांचाही विचार करा !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

साधनेचे महत्व !

‘डोळ्यांनी जंतू दिसत नाहीत; पण ते सूक्ष्मदर्शक यंत्राने दिसतात. त्याचप्रमाणे सूक्ष्मदर्शक यंत्राने दिसत नाही, असे सूक्ष्मातीसूक्ष्म जग साधनेने कळते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

धर्मबंधनाचे महत्त्व

‘व्यक्तीस्वातंत्र्याने मानव भरकटत जातो; कारण तो सात्त्विक नाही. असे होऊ नये; म्हणून त्याला धर्मबंधन हवे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी !

‘खरे बुद्धीप्रामाण्यवादी प्रयोग करून निष्कर्षाला येतात. याउलट स्वतःला बुद्धीप्रामाण्यवादी म्हणवणारे साधनेचे, अध्यात्माचे प्रयोग न करता ‘ते खोटे आहेत’, असे म्हणतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले