असे असतांना देशाचे कधी भले होईल का ?
‘देशाचे काहीही होवो, मला पद मिळाले की झाले’, या वृत्तीचे राजकारणी असल्यावर देशाचे कधी भले होईल का ?’
‘देशाचे काहीही होवो, मला पद मिळाले की झाले’, या वृत्तीचे राजकारणी असल्यावर देशाचे कधी भले होईल का ?’
‘माणूस सोडून कोणताही प्राणी अथवा वनस्पती सुटी घेत नाही. देवही एक सेकंदाची सुटी घेत नाही. माणूस मात्र शनिवार आणि रविवार सुटी घेतो. एवढेच नव्हे, तर वर्षातूनही काही दिवस हक्काने सुटी घेतो. असे असतांना यासंदर्भात माणूस श्रेष्ठ….
‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी बुद्धीपलीकडील ‘देव नसतो’, असे म्हणणे, हे बालवाडीतील मुलाने ‘वैद्य, अधिवक्ता इत्यादी नसतात’, असे म्हणण्यासारखे आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘विज्ञानाची भाषा इंग्रजी आहे, तर अध्यात्माची भाषा संस्कृत आणि संस्कृतोद्भव भाषा आहेत. यामुळे ईश्वरप्राप्ती करू इच्छिणार्यांनी संस्कृत किंवा संस्कृतोद्भव भाषेतच अध्यात्म शिकावे.’
‘इतिहास नेहमी ‘वर्तुळात फिरतो’, असे म्हणतात. भारताचा गतवैभव असलेला काळ येईलच. वैदिक संस्कृतीचे ते मंतरलेले दिवस येतीलच. सज्जनांचे रक्षण करणारा, असज्जनांचे (दुर्जनांचे) निवारण करणारा, पृथ्वी स्वाधीन ठेवणारा अखंड भारताचा राजा होईलच.
‘धर्मशिक्षणामुळे धर्मासाठी त्याग करण्यास लाखो मुसलमान सिद्ध असतात, तर हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने ते बुद्धीप्रामाण्यवादी होऊन धर्माला खोटे ठरवतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘पालक त्यांच्या मुलांमध्ये कला-गुणांचा विकास व्हावा; म्हणून त्यांच्या आवडीनुसार संगीत, नृत्य यांसारख्या कलांचे शिक्षण देतात; परंतु फारच थोडे पालक मुलांच्या जन्माचे सार्थक व्हावे, या उद्देशाने त्यांना साधना शिकण्यास साहाय्य करतात.’
‘शाळेपासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत कोणत्याही शिक्षणात माणुसकी न शिकवल्यामुळे प्रत्येक क्षेत्रात जनतेला लुबाडणारे व्यावसायिक आणि नोकरी करणारे निर्माण झाले आहेत.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘राजकीय पक्षाचे किंवा एखाद्या मोठ्या संघटनेचे पद मिळण्यापेक्षा भगवंताचा भक्त होणे चांगले !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !