सत्ययुगाचे महत्त्व !

‘सत्ययुगात नियतकालिके, दूरचित्रवाहिन्या, संकेतस्थळे इत्यादींची आवश्यकताच नव्हती; कारण वाईट बातम्या नसायच्या आणि सर्वजण भगवंताच्या अनुसंधानात असल्याने आनंदी होते.’

साधक आणि साधिकांना सासर-माहेर नसणे !

सनातनचे विवाहित साधक-साधिका सर्वस्वाचा त्याग करून साधना करत असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी मान-पान, अधिकार असे काही रहात नाही.

राजकारणी आणि सांप्रदायिक यांच्यातील भेद

‘स्वार्थासाठी राजकीय पक्ष पालटणारे सहस्रो असतात; पण स्वार्थत्यागी सांप्रदायिकांच्या मनाला संप्रदाय पालटण्याचा विचार एकदाही शिवत नाही !’

५-१० माणसे एकत्र आली तरी…

झाडे आणि भिन्न प्रकृतीची माणसे यांतील भेद दाखवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

हिंदु धर्माची महानता !

‘कुठे पृथ्वीवर राज्य करण्याचे ध्येय असणारे इतर पंथ, तर कुठे ‘प्रत्येकाला ईश्वरप्राप्ती व्हावी’, हे उदात्त ध्येय असणारा हिंदु धर्म !’

जनतेला साधना न शिकवल्याचा परिणाम !

‘स्वातंत्र्यापासून आतापर्यंत भारतात राज्य करणार्‍या एकाही राजकीय पक्षाने जनतेला साधना शिकवून सात्त्विक न केल्याने भारतात प्रतिदिन अनेक तर्‍हेचे सहस्रो गुन्हे होत आहेत !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

ईश्‍वरप्राप्‍ती लवकर कशी होईल ?

‘ईश्‍वरप्राप्‍तीसाठी तन-मन-धनाचा त्‍याग करायचा असतो. त्‍यामुळे आयुष्‍य धन मिळवण्‍यात फुकट घालवण्‍यापेक्षा सेवा करून धनाबरोबर तन आणि मन यांचाही त्‍याग केला, तर ईश्‍वरप्राप्‍ती लवकर होते.’ – (परात्‍पर गुरु) डॉ. आठवले

कुठे काही वर्षांतच विसरले जाणारे मायेतील विषय, तर कुठे युगानुयुगे अभ्यासले जाणारे अध्यात्मातील ग्रंथ !

‘मायेतील विषय लवकर विसरले जातात. त्यामुळे पहिले आणि दुसरे महायुद्धच नाही, तर नोबेल पारितोषिक मिळवणारे शास्त्रज्ञ यांचीही नावे २५ ते ५० वर्षांत कुणाला ज्ञात नसतात.