हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी व्हा !

‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कुणी काही करण्याची आवश्यकता नाही; कारण कालमाहात्म्यानुसार ते होणारच आहे; पण या कार्यात जे तन-मन-धनाचा त्याग करून सहभागी होतील, त्यांची साधना होऊन ते जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होतील.’

ज्योतिषशास्त्राचे सर्वश्रेष्ठत्व !

‘कुठे पुढील काही वर्षांत काय होणार, याचा अंदाज बुद्धीचा वापर करून सांगणारे पाश्चात्त्य, तर कुठे युगायुगांच्या संदर्भात सांगणारे ज्योतिषशास्त्र !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

हिंदु राष्ट्राची स्थापना ही ईश्वरनियोजित प्रक्रिया !

हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी शारीरिक आणि मानसिक स्तरावर क्षात्रतेजाच्या संवर्धनाचे कार्य करत आहेत, तर संत आणि सनातन संस्थेसारख्या अन्य संघटना ब्राह्मतेजाच्या संवर्धनाचे कार्य करत आहेत.

धर्माचे महत्त्व !

धर्म पाप-पुण्य, धर्माचरण इत्यादी संदर्भांत शिकवतो. त्यामुळे मुळातच व्यक्ती सात्त्विक बनते. तिच्या मनात चुकीची गोष्ट करण्याचा विचारही येत नाही. ती पापभीरू बनते, म्हणजे पाप करण्याचे, चुकीची गोष्ट करण्याचे टाळते.

सत्ययुगाचे महत्त्व !

‘सत्ययुगात नियतकालिके, दूरचित्रवाहिन्या, संकेतस्थळे इत्यादींची आवश्यकताच नव्हती; कारण वाईट बातम्या नसायच्या आणि सर्वजण भगवंताच्या अनुसंधानात असल्याने आनंदी होते.’

साधक आणि साधिकांना सासर-माहेर नसणे !

सनातनचे विवाहित साधक-साधिका सर्वस्वाचा त्याग करून साधना करत असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी मान-पान, अधिकार असे काही रहात नाही.

राजकारणी आणि सांप्रदायिक यांच्यातील भेद

‘स्वार्थासाठी राजकीय पक्ष पालटणारे सहस्रो असतात; पण स्वार्थत्यागी सांप्रदायिकांच्या मनाला संप्रदाय पालटण्याचा विचार एकदाही शिवत नाही !’

५-१० माणसे एकत्र आली तरी…

झाडे आणि भिन्न प्रकृतीची माणसे यांतील भेद दाखवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार