धर्मांध राष्ट्रहानी करत असल्यामागील कारण !

धर्मांध राष्ट्रहानी करत असल्यामागील कारण !

‘धर्मांधांमध्ये राष्ट्रप्रेमापेक्षा धर्मप्रेम अधिक असल्यामुळे ते धर्मासाठी कधीही आणि कितीही राष्ट्रहानी करतील’, हे स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या शासनकर्त्यांच्या आणि बहुसंख्य हिंदूंच्या लक्षात आले नाही’, हे त्यांना लज्जास्पद आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

ब्राह्मणद्वेष्ट्यांचे पाप !

ब्राह्मणद्वेष्ट्यांचे पाप !

‘आजोबा, पणजोबा यांनी गुन्हा केला, तर नातवंडे, पतवंडे यांना शिक्षा करत नाहीत; मात्र काही ब्राह्मणद्वेष्टे काही पिढ्यांपूर्वी काही ब्राह्मणांनी केलेल्या कथित अपराधांची शिक्षा सर्वच ब्राह्मणांना करत आहेत. हे पाप होय !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

बुद्धीप्रामाण्यवाद्यांना मोजावे लागणारे मूल्य !

बुद्धीप्रामाण्यवाद्यांना मोजावे लागणारे मूल्य !

‘जे बुद्धीप्रामाण्यवादी ‘देव नाही’ म्हणतात, त्यांना भक्तांना येते, तशी चिरंतन आनंदाची अनुभूती कधी येईल का ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

बुद्धीच्या स्तरावरील विज्ञान आणि बुद्धीपलीकडील अध्यात्म !

बुद्धीच्या स्तरावरील विज्ञान आणि बुद्धीपलीकडील अध्यात्म !

‘विज्ञान अनेक वर्षे एखाद्या गोष्टीचे बुद्धीने स्थुलातील कारण शोधते. याचे कारण हे की, कारण कळल्याशिवाय त्याला उपाय कळत नाही, तर अध्यात्म त्यामागील बुद्धीपलीकडील सूक्ष्मातील शास्त्र आणि उपाय तात्काळ सांगते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

इतर धर्मीय आणि हिंदू यांच्या ध्येयातील भेद !

इतर धर्मीय आणि हिंदू यांच्या ध्येयातील भेद !

‘इतर धर्मियांचे ध्येय असते ‘दुसर्‍या धर्मियांवर अधिकार गाजवणे’, तर हिंदूंचे ध्येय असते ईश्वरप्राप्ती !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु धर्माचे एकमेवाद्वितीयत्व !

हिंदु धर्माचे एकमेवाद्वितीयत्व !

‘हिंदु धर्मात हिंदु धर्मातील शाश्वत मूल्ये आणि सिद्धांत समजून घेऊन त्यानुसार आचरण करून धर्माची अनुभूती, म्हणजे साक्षात ईश्वराची अनुभूती घेण्याला महत्त्व आहे.’ हिंदूंचा धर्मप्रसार या तत्त्वावर आधारित असल्यामुळेच हिंदु धर्माचा गंधही नसलेले सहस्रो अन्य पंथीय विदेशी लोक आजही हिंदु धर्माकडे आकर्षित होऊन हिंदु धर्मानुसार आचरणही करत आहेत.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

भारत – बाह्य तसेच अंतर्गत शत्रू असलेला एकमेव देश !

भारत – बाह्य तसेच अंतर्गत शत्रू असलेला एकमेव देश !

‘इतर देशांना देशांतर्गत शत्रू नसतात. भारताला आतील आणि बाहेरील असे दोन्ही शत्रू आहेत. असे शत्रू असणारा जगातील एकमेव देश आहे भारत. भारतियांना हे लज्जास्पद !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

राष्ट्राभिमान जागृत ठेवण्यासाठी प्रतिदिन कार्यरत रहा !

राष्ट्राभिमान जागृत ठेवण्यासाठी प्रतिदिन कार्यरत रहा !

‘आता केवळ २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट यांदिवशी राष्ट्राभिमान जागृत करण्यासाठी झेंडावंदन करणे, भाषणे करणे आणि देशभक्तीपर गीते लावणे असे करून चालणार नाही, तर प्रतिदिनच यासाठी काहीतरी करणे आवश्यक आहे, नाहीतर हिंदूंचे आणि भारताचे अस्तित्व टिकणार नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

उमेदवारांना मतांची भीक का मागावी लागते ?

उमेदवारांना मतांची भीक का मागावी लागते ?

‘मतदारांकडून मतांची भीक मागावी लागते, हे उमेदवारांना लज्जास्पद ! त्यांनी निवडून आल्यावर मतदारांसाठी काही केले असते, तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी !

तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी !

‘खरे बुद्धीप्रामाण्यवादी प्रयोग करून निष्कर्षाला येतात. याउलट स्वतःला बुद्धीप्रामाण्यवादी म्हणवणारे साधनेचे, अध्यात्माचे प्रयोग न करता ‘ते खोटे आहेत’, असे म्हणतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले