लोकमान्य टिळक यांचे स्वातंत्र्यलढ्यातील समर्पण हे देशवासियांना नेहेमीच प्रेरणा देत राहील ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट’च्या वतीने लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन १ ऑगस्ट या दिवशी सन्मानित करण्यात आले. त्याआधी पंतप्रधान मोदी यांनी लोकमान्य टिळकांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले.

पंतप्रधान मोदी यांच्‍या पुणे दौर्‍याला युवक काँग्रेसचा विरोध !

पंतप्रधान मोदी यांच्‍या दौर्‍याचा विरोधकांनी अनेक माध्‍यमांतून निषेध व्‍यक्‍त केला आहे. युवक काँग्रेसच्‍या वतीने पुण्‍यातील परिसरामध्‍ये पोस्‍टर्स (फलक) लावण्‍यात आली आहेत.

नसरापूर येथे (पुणे) भूस्‍खलन होण्‍याची शक्‍यता !

येथील बाजारपेठेमधून बनेश्‍वर मंदिराकडे जाणारा रस्‍ता २६ जुलै या दिवशी सायंकाळी ५ नंतर खचला. या वेळी जिल्‍हा परिषदेचे बांधकाम शाखा अभियंता, मंडलाधिकारी आणि नसरापूर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांनी घटनास्‍थळी जाऊन ..

दगडूशेठ बाप्पाचे दर्शन ते मेट्रोचे लोकार्पण, असा होईल पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा !

पंतप्रधान सकाळी ११ वाजता दगडूशेठ गणपति मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत. तिथे पूजा-अर्चा केल्यानंतर सकाळी ११.४५ वाजता त्यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

पुण्यात अटक केलेल्या आतंकवाद्यांकडे सापडली संवेदनशील स्थळांची छायाचित्रे !

राजस्थानमधील जयपूर शहरात बाँबस्फोट घडवून आणण्याच्या सिद्धतेत असलेल्या ‘अल् सुफा’ या आतंकवादी टोळीशी संबंधित दोघा आतंकवाद्यांना पुणे पोलिसांनी अटक केली होती. या दोघांनी कुलाब्यातील ‘छाबड हाऊस’ची पहाणी केल्याची माहिती समोर आली आहे.

टीईटी गैरव्‍यवहार परीक्षेतील उमेदवारांना अपात्र करावे !

वर्ष २०२३ मध्‍ये घेतलेल्‍या ‘शिक्षक अभियोग्‍यता परीक्षा आणि बुद्धिमता चाचणी परीक्षा या उमेदवारांनी दिली आहे. हे सर्व शिक्षक अपात्र आहेत, तरीही परीक्षा कशी देतात ? असाही प्रश्‍न उपस्‍थित केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या दौर्‍यासाठी ५ सहस्र पोलिसांचा बंदोबस्‍त !

पंतप्रधान नरेंद्र मोदी १ ऑगस्‍ट या दिवशी पुण्‍यात येणार असल्‍याने शहरात कडक बंदोबस्‍त ठेवला आहे. पंतप्रधानांच्‍या सुरक्षेचे दायित्‍व असलेले विशेष सुरक्षा पथक (एस्.पी.जी), ‘फोर्स वन’चे सैनिक अशा एकूण ५ सहस्र पोलिसांचा बंदोबस्‍त आहे.

पुणे येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या !

फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये बी.एस्.सी.च्या (भौतिकशास्त्र) तिसर्‍या वर्षात शिकणार्‍या ओम कापडणे या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील ४ जिल्ह्यांतील १४४ गावे दरडप्रवण भागात, तर ५९४ पूरप्रवण क्षेत्रे असल्याचे स्पष्ट !

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या ४ जिल्ह्यांमधील १४४ गावे दरडप्रवण भागात असून ५ जिल्ह्यांत ५९४ पूरप्रवण क्षेत्रे असल्याचे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, तसेच भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण यांनी केलेल्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.

पुण्यातील आतंकवादी कटाच्या कारवाई प्रकरणात रत्नागिरीतून आणखी एकाला अटक ! 

ए.टी.एस्.ने (आतंकवादविरोधी पथकाने) पुण्यातील आतंकवादी कटाच्या अन्वेषणात आतंकवाद्यांना साहाय्य करणार्‍यांच्या मुसक्या आवळायला चालू केले आहे. २ आतंकवाद्यांना अटक केल्यानंतर आता आणखी एकाला रत्नागिरीतून अटक करण्यात आली आहे.