महिलांसाठी ‘नारी शक्ती दूत’ या ‘अ‍ॅप’चे अनावरण !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महिलांसाठी ‘नारी शक्ती दूत’ या ‘अ‍ॅप’चे अनावरण करण्यात आले. राज्य सरकारच्या वतीने महिलांसाठी राबवण्यात येणार्‍या विविध सरकारी योजना, विविध घोषणा आणि उपक्रम यांची माहिती या माध्यमातून महिलांपर्यंत पोचवण्यात येणार आहे.

भगवान श्रीरामाचे भव्य मंदिर उभे रहावे, अशी नियतीचीच इच्छा होती आणि त्यासाठी तिनेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवड केली ! – लालकृष्ण अडवाणी

अयोध्येत भगवान श्रीरामाचे भव्य मंदिर उभे रहावे, अशी नियतीचीच इच्छा होती आणि त्यासाठी तिनेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवड केली, असे विधान श्रीरामजन्मभूमीच्या आंदोलनातील भाजपचे प्रमुख नेते लालकृष्ण अडवाणी यांनी केले आहे.

KalaRam Darsan PM MODI : नाशिक येथील काळाराम मंदिरातील प्रभु श्रीरामाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतले दर्शन !

श्री काळाराम मंदिर संस्थानचे मुख्य महंत आणि विश्‍वस्त यांच्या वतीने मोदी यांचा प्रभु श्रीरामाची चांदीची प्रतिमा, शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

27th National Youth Festival : घराणेशाहीच्या राजकारणामुळे देशाची हानी ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

तरुण राजकारणात आले, तर घराणेशाहीचे राजकारण अल्प होत जाईल.राजकीय माध्यमातूनही देशाची सेवा करता येईल.

नाशिककरांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उत्साहात स्वागत !

राष्ट्रीय युवा महोत्सवाचे औचित्य साधत नाशिक दौर्‍यावर आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सहस्रो नाशिककरांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून उत्स्फूर्त स्वागत केले.

महाराष्ट्राला विकसित भारताचे अंग करण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही ! – पंतप्रधान

महाराष्ट्राला विकसित भारताचे अंग करण्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही, असे आश्वासन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. १२ जानेवारी या दिवशी उरण येथील सार्वजनिक सभेत ते बोलत होते.

Ayodhya RamMandir PranPratishta : श्रीराममंदिराच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ११ दिवसांच्या अनुष्ठानाला प्रारंभ !

श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना उद्देशून एक संदेश प्रसारित केला आहे. यात त्यांनी ते पुढील ११ दिवस अनुष्ठान करणार असल्याचे घोषित केले आहे.

Inauguration Atal Setu: पंतप्रधानांच्या हस्ते ‘अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू’चे उद्घाटन !

सेतूला जोडणार्‍या विविध मार्गांमुळे वर्सोवा ते विरार मार्ग आणि विरार ते रामनाथ (अलिबाग) हा नवीन मार्ग होणार आहे.

आज पंतप्रधानांच्या हस्ते ‘अटल सेतू’चे लोकार्पण !

मुंबईतून नवी मुंबईत जाण्यासाठी वा नवी मुंबईतून मुंबईत येण्यासाठी नागरिकांना दीड ते दोन घंटे द्यावे लागतात; मात्र हा प्रवास या सेतूमुळे केवळ २० ते २२ मिनिटांत होईल.

नाशिक येथे रामकुंडावर गोदावरीची महाआरती करून पंतप्रधान घेणार काळाराम मंदिराचे दर्शन !

मोदी यांचे नाशिक विमानतळावर आगमन झाल्यानंतर तेथून ते संभाजीनगर रस्त्यावर नीलगिरी बाग येथील मैदानावर हेलिकॉप्टरने उतरणार आहेत. त्यानंतर उपाहारगृह मिर्ची ते संत जनार्दन स्वामी आश्रमापर्यंत त्यांचा ‘रोड शो’ असेल.