गोव्यातून आंध्रप्रदेशला नेण्यात येणारे मद्य बेळगाव येथे कह्यात

हे मद्य गोव्याच्या सीमेवरून विनातपास बेळगावला पोचले कि लाच घेऊन ते सोडण्यात आले ? हल्ली काही दिवसांत अशा अनेक घटना घडल्या आहेत. सरकार याचे अन्वेषण करून दोषींवर कारवाई करणार का ?

येत्या दिवाळीला श्रीकृष्ण  उत्सव साजरा करा !

येत्या दिवाळीला नरकासुरांचा उदो उदो करू नका, त्यापेक्षा श्रीकृष्ण उत्सव साजरा करा. आपल्या संस्कृतीचे जतन करा, असे आवाहन वीजमंत्री श्री. सुदिन ढवळीकर यांनी केले.

दसर्‍याच्या निमित्ताने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या शुभेच्छा !

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि राज्यपाल पी.एस्. श्रीधरन् पिल्लई यांनी गोमंतकियांना दसर्‍याच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत.

नरकासुरदहन प्रथा बंद करा !

गोव्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांचे आवाहन वास्को, २२ ऑक्टोबर (वार्ता.) – राज्यात दीपावलीच्या पूर्वसंध्येला मोठ्या प्रमाणात राबवली जाणारी नरकासुरदहन प्रथा बंद करण्याचे आवाहन वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले आहे. वास्को येथे एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलतांना मंत्री श्री. सुदिन ढवळीकर यांनी हे आवाहन केले. ते पुढे म्हणाले, ‘‘नरकासुरदहन प्रथा पूर्वी लहान प्रमाणात होती. पूर्वी लहान मुलेच … Read more

Goa : कवळे येथील प्रसिद्ध श्री शांतादुर्गा मंदिरातील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला गोव्याचे पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी दिली भेट !

कवळे येथील श्री शांतादुर्गा मंदिरातील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला गोव्याचे पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांची भेट दिली.

सनातन धर्मविरोधी उदयनिधी स्टॅलिन यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून कठोर कारवाई करा !

तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन, खासदार ए. राजा आणि कर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी सनातन धर्मावर आक्षेपार्ह विधान केल्याने समाजामध्ये धार्मिक तेढ आणि संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे.

गोवा : बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केल्याने पोलीस हवालदाराच्या विरोधात बनवेगिरीचा गुन्हा प्रविष्ट

पोलीस खात्यात गुन्हेगारी वृत्तीचे पोलीस कर्मचारी आढळण्याचे वाढते प्रमाण पोलीस खात्याची विश्वासार्हता नष्ट करते ! पोलीस प्रशिक्षणात प्रशिक्षणार्थींना नैतिकतेचे शिक्षण दिले जात नाही का ?

गोवा : श्री सरस्वती पूजनाची अनुमती नाकारली !

हिंदूंच्याच देशात विद्येची देवता असलेल्या श्री सरस्वतीदेवीच्या पूजनाला महाविद्यालयाकडून दुसर्‍या वर्षीही अनुमती न मिळणे दुर्दैवी ! आतापर्यंत नागरिकांना धर्मनिरपेक्षतेचे डोस पाजल्याचा हा परिणाम आहे !

प्रख्यात प्रवचनकार भारताचार्य सु.ग. शेवडे यांची सनातन संस्थेच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमाला भेट

भारताचार्य सु.ग. शेवडे (वय ८९ वर्षे) यांनी १९ ऑक्टोबर २०२३ या दिवशी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी आश्रमात चालणार्‍या राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या कार्याची माहिती जाणून घेतली.

गोवा : मडगाव ‘एक्सप्रेस’च्या स्वयंपाकघरात उंदरांचा सुळसुळाट !

राखीव पोलीस दलाचा प्रतिनिधी म्हणाला, ‘‘रेल्वे रुळाच्या बाजूने ४०० ते ५०० उंदीर आहेत आणि त्यातील ४ ते ५ रेल्वेमध्ये घुसल्यास काय झाले ?’’ संबंधितांवर रेल्वे प्रशासन योग्य ती कारवाई करील का ?