राष्ट्रपती पदासाठी १८ जुलैला मतदान !

भारताचे विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै या दिवशी संपत असून त्यांना दुसर्‍यांदा संधी दिली जाण्याची शक्यता नाही.

अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांचा मतदानासाठीचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला !

राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी एक दिवसाचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाकडे केला होता. हा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी एम्.आय.एम्.कडून महाविकास आघाडीकडे सहकार्याचा प्रस्ताव !

राज्यसभेच्या ६ व्या जागेसाठी भाजप आणि शिवसेना या दोघांना अपक्ष आमदारांच्या साहाय्याची आवश्यकता आहे.

लालूचशाही नव्हे ना ?

‘लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेली व्यवस्था ’, हे कागदावरच आहे, जनताही अधिक पैसे देणाऱ्या उमेदवाराला मत देते किंवा मतदानच करत नाही. ‘योग्य व्यक्ती निवडण्याचा पर्याय जनतेकडे नाही’; कारण बहुतांश उमेदवार हे स्वकर्तृत्वावर निवडून येऊ शकत नाहीत, अशी केविलवाणी स्थिती आहे.

राज्यसभा निवडणुकीत मतदानाची अनुमती मिळण्यासाठी नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांचा ‘ईडी’कडे अर्ज !

राष्ट्रवादी काँग्रेसचे हे दोन्ही वरिष्ठ नेते आर्थिक अपहाराच्या प्रकरणी सध्या आर्थर रोड येथील कारागृहात आहेत. प्रकृती अस्वास्थाच्या कारणास्तव नवाब मलिक सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.

… तर पुन्हा मास्क वापरण्याचा निर्णय घ्यावा लागेल ! – उपमुख्यमंत्री

कोरोनाच्या तिन्ही लाटांमध्ये राज्यातील जनतेने कोरोनाचा अनुभव घेतला आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली, तर राज्यात पुन्हा मास्क वापरण्याचा निर्णय घ्यावा लागेल !

शिवसेनेने पाठिंबा नाकारल्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांचा राज्यसभेची निवडणूक न लढण्याचा निर्णय !

शिवसेनेने पाठिंबा नाकारल्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यसभेची निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयीची घोषणा त्यांनी पत्रकार परिषदेत केली. छत्रपती संभाजीराजे, तुम्ही नामी संधी घालवली ! – अरविंद सावंत

संभाजीनगर येथे ग्रामपंचायत निवडणुकीत हस्तक्षेप केल्याप्रकरणी सहशिक्षक निलंबित !

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची कारवाई !

विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक घोषित !

निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक घोषित केली आहे. जुलै मासात १० जागा रिक्त होणार असून यासाठी २० जून या दिवशी मतदान होईल. त्याच दिवशी संध्याकाळी मतमोजणी होऊन निकाल घोषित करण्यात येणार आहे.

शिवसेनेचे संजय राऊत आणि संजय पवार यांच्याकडून राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज प्रविष्ट !

शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि शिवसेनेचे कोल्हापूर विभाग प्रमुख संजय पवार यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज प्रविष्ट केला आहे. या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते.