संभाजीनगर येथे ग्रामपंचायत निवडणुकीत हस्तक्षेप केल्याप्रकरणी सहशिक्षक निलंबित !

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची कारवाई !

विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक घोषित !

निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक घोषित केली आहे. जुलै मासात १० जागा रिक्त होणार असून यासाठी २० जून या दिवशी मतदान होईल. त्याच दिवशी संध्याकाळी मतमोजणी होऊन निकाल घोषित करण्यात येणार आहे.

शिवसेनेचे संजय राऊत आणि संजय पवार यांच्याकडून राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज प्रविष्ट !

शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि शिवसेनेचे कोल्हापूर विभाग प्रमुख संजय पवार यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज प्रविष्ट केला आहे. या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते.

१३ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा आरक्षण सोडत कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून घोषित !

महापालिकांची आरक्षणाची सोडत ३१ मे या दिवशी काढण्यात येणार आहे, अशी घोषणा राज्याच्या निवडणूक आयोगाने केली आहे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि वसई-विरारसह राज्यातील १३ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा आरक्षण सोडत कार्यक्रम होणार आहे

ऑस्ट्रेलियातील ‘हवामान’ निवडणूक !

‘आम्हाला मत दिल्यास विनामूल्य गहू, तांदूळ देऊ’, ‘रस्ता बांधून देऊ’, ‘नोकर्‍या देऊ’, अशी आश्वासने ऐकण्याची सवय असलेल्या भारतियांना हे वाचून थोडे अवघडल्यासारखे वाटेल. ‘पर्यावरण वाचवा’, किंवा ‘हवामान पालटामुळे होणारे दुष्परिणाम’ या सूत्रावर निवडणूक, हे आपल्या पचनी पडणे जरा कठीणच !

तृणमूल काँग्रेसने बांगलादेशी महिलेला दिली होती विधानसभेची उमेदवारी !

अन्य देशाच्या नागरिकांना उमेदवारी देणारी तृणमूल काँग्रेस राष्ट्रघातकीच होत ! अशा पक्षांवर कारवाई झाली पाहिजे !

स्थानिक निवडणुकीत ‘ओबीसी’ आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाकडून अनुमती !

सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला एका आठवड्यात मध्यप्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अधिसूचित करण्याचे निर्देशही दिले आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीविषयी सर्वाेच्च न्यायालयाची महाराष्ट्र शासनाला विचारणा !

ज्या ठिकाणी अधिक पाऊस नसतो, त्या ठिकाणी निवडणुका घेण्यास काय हरकत आहे ? अशी विचारणा सर्वाेच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनाला केली आहे. याविषयी जिल्हानिहाय आढावा घेऊन निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्याचे निर्देश न्यायालयाने महाराष्ट्र शासनाला दिले आहेत.

‘ओआयसी’ आणि पाक !

इस्लामी देश अन्य कुठल्याही सूत्रांवरून विभागलेले असले, तरी धर्माच्या सूत्रावरून ते जागतिक स्तरावर एकत्रित येतात, हे यातून स्पष्ट होते. हे लक्षात घेऊन भारताने अंतर राखूनच इस्लामी राष्ट्रांशी संबंध प्रस्थापित करणे आवश्यक !

तेलंगाणात सत्ता मिळाल्यास मुसलमानांचे आरक्षण रहित करू ! – भाजप

राज्यातील रंगारेड्डी जिल्ह्यातील तुक्कुगुडा येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एका सभेला संबोधित केले. त्यावेळी त्यांनी वरील वक्तव्य केले.