अंबरनाथ शहर विद्रुपीकरण करणार्‍यांवर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी

येथील शहराच्या पूर्व भागात रेल्वे स्थानकाला लागून असलेला शिवाजी चौक परिसर शहरातील महत्त्वाचा भाग आहे. या भागातील उखडलेले रस्ते, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या चौथर्‍याच्या पायर्‍यांपर्यंत फेरीवाल्यांचा असलेला गराडा, चौथर्‍याच्या चारही बाजूंनी अनधिकृतपणे लावलेले विज्ञापनांचे फलक यांमुळे या परिसराला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे.

हिंदुविरोधी फलक लावल्यावरून पाकमधील सत्ताधारी पक्षाचा नेता निलंबित

इम्रान खान यांच्या पक्षाने केलेली ही कारवाई केवळ आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकची प्रतिमा उंचावण्यासाठी आहे, हे लक्षात घ्या ! खान यांना हिंदूंविषयी कणव असेल, तर त्यांनी हिंदूंवर अत्याचार करणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई करावी !

(म्हणे) ‘केंद्र सरकारने सीएए तात्काळ मागे घ्यावा !’ – गोव्याचे आर्चबिशप फिलीप नेरी फेर्रांव

सीएए कायद्यामुळे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथील पीडित ख्रिस्त्यांना भारताचे नागरिकत्व मिळणार आहे. असे असतांनाही भारतातील ख्रिस्ती पाद्री कायद्याला विरोध करतात. हे भारतातील ख्रिस्त्यांना मान्य आहे का ?

राज्य सरकारला नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करावाच लागेल ! – राजस्थान विधानसभेचे सभापती सी.पी. जोशी

जोशी हे काँग्रेसचे आहेत. काँग्रेसच्या नेत्यांना हे ठाऊक आहे, तर त्यांचा पक्ष या कायद्याला विरोध का करत आहे ? ते स्पष्टपणे आणि अधिकृतपणे ही माहिती लोकांना का सांगत नाहीत ? जनतेला खोटे सांगून त्याचा विरोध करण्यास का भाग पाडले जात आहे ?