देहलीत पुन्हा आम आदमी पक्षाचे सरकार

देहली विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा आम आदमी पक्षाचा (आपचा) विजय झाला आहे. विधानसभेच्या ७० जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत आप ६२ ठिकाणी, तर भाजप ८ जागांवर आघाडीवर आहे.

गुरदासपूर (पंजाब) येथे ‘शिवसेना हिंदुस्थान’ संघटनेच्या नेत्यावर गोळीबार

पंजाबमध्ये खलिस्तानवाद्यांकडून जाणीवपूर्वक हिंदु नेत्यांना लक्ष्य करून त्यांच्या हत्या केल्या जात आहेत; मात्र याकडे राज्यातील काँग्रेस आणि केंद्र सरकार गांभीर्याने पाहत नाहीत, हे दुर्दैव ! पोलीस संरक्षण कोणत्या आधारे हटवण्यात आले, याची माहिती हिदूंंना दिली पाहिजे !

उत्तराखंडमधील मंदिरांच्या सरकारीकरणाच्या विरोधात डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांच्याकडून याचिका प्रविष्ट

उत्तराखंड राज्यातील ५१ मंदिरांचे राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप सरकारने सरकारीकरण केले. ही अवैध कृती करण्यापूर्वी उत्तराखंडच्या अ‍ॅटर्नी जनरलनी माझ्याशी सल्लामसलत करायला हवी होती. तसे ने केल्यानेच मला उत्तराखंड उच्च न्यायालयात या निर्णयाच्या विरोधात जनहित याचिका प्रविष्ट करावी लागली।

‘शिकारा’ चित्रपटाद्वारे विधु विनोद चोप्रा यांनी काश्मिरी हिंदूंच्या जखमेवर मीठ चोळले ! – हिंदु जनजागृती समिती

काश्मिरी हिंदूंच्या दुःखावर फुंकर घालण्याऐवजी विधु विनोद चोप्रा यांनी ३० वर्षांपूर्वीच्या जखमा उकरून काढून त्यावर मीठ चोळले आहे. त्यामुळे या चित्रपटावर बहिष्कार घालावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले आहे.

भारताचे ६० जणांचे कबड्डी पथक कथित विश्‍वचषक स्पर्धेसाठी पाकमध्ये !

पाकिस्तानमध्ये कबड्डीच्या विश्‍वचषक स्पर्धेसाठी भारतीय कबड्डी संघ ६० खेळाडूंच्या पथकासह अटारी सीमेवरून पाकमध्ये पोचला आहे; मात्र या पथकाला पाकमध्ये जाण्याची अनुमती कोणी दिली, व्हिसा कसा मिळाला, याविषयी केंद्रीय गृहमंत्रालय आणि क्रीडा मंत्रालय यांना कोणतीही माहिती नसल्याचे समोर आले आहे.

भारत विश्‍वगुरु होण्यासाठी गाय, ग्राम, गुरुकुल आणि गंगा सुदृढ होणे आवश्यक ! – अधिवक्ता चंद्रशेखर राव, उपाध्यक्ष, बंटवाळ अधिवक्ता संघ

मंगळुरू येथे २ दिवसांचे दक्षिण जिल्हा हिंदु राष्ट्र अधिवेशन : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकतेच २ दिवसांचे दक्षिण जिल्हा स्तरावरचे हिंदु राष्ट्र अधिवेशन येथील श्री व्यंकटरमण देवस्थानातील सभागृहात पार पडले.

संसदेत समान नागरी कायदा मांडण्यात येण्याची शक्यता

भाजपने त्याच्या दोन्ही सभागृहांतील खासदारांसाठी पक्षादेश (व्हिप) बजावला आहे. यामुळे त्यांना संसदेत उपस्थित राहणे बंधनकारक असणार आहे. या पार्श्‍वभूमीवर संसदेत भाजप सरकारकडून समान नागरी कायदा मांडला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नागरिकत्व सुधारणा कायद्याला काही राष्ट्र विरोधकांकडून केवळ स्वार्थासाठी विरोध ! – अधिवक्ता कृष्णमूर्ती पी.

नागरिकत्व सुधारणा कायद्याला काही लोक सोयीस्कररित्या विरोध करत आहेत. धर्मांध त्यांचा लाभ हवा असेल, तेव्हा ‘शरियत’ हवे’, असे म्हणतात, तर दुसरीकडे नागरिकत्व सुधारणा कायद्याला मात्र विरोध करतात.

अ‍ॅसिड फेकण्याची धमकी देत पुण्यात शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍याला अटक

‘अ‍ॅसिड’ फेकण्याची धमकी देत शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या नराधमाला पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर विनयभंग, बलात्कार, तसेच पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी प्रतिदिन पीडित मुलीच्या शाळेबाहेर थांबून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा; मात्र ती प्रतिसाद देत नसल्याने त्याने तिला तिच्यावर अ‍ॅसिड फेकण्याची धमकी दिली.

शासकीय दूध वाहतूक ठेकेदारांची वर्षभराची ७ कोटी ४७ लाख रुपयांची देयके रखडली, देयके देण्यासाठी शासनाकडे पैसे नाहीत

राज्यात शासकीय दुधाची वाहतूक करणार्‍या ठेकेदारांची मागील १ वर्षापासून ७ कोटी ४७ लाख रुपयांची देयके शासनाने रखडवली आहेत. वर्षभर पाठपुरावा करून शासनाकडून अद्याप हा निधी देण्यात आलेला नाही.