अ‍ॅट्रॉसिटीच्या प्रकरणात विनाचौकशी अटक करता येणार !

‘एका कायद्याविषयी सर्वोच्च न्यायालयाने एक भूमिका घेतली. ती केंद्र सरकारने पालटली. नंतर केंद्र सरकारच्या पालटलेल्या भूमिकेचे न्यायालयाने समर्थन केले, हा चक्रावणारा न्याय आहे’, असे जनतेला वाटल्यास चूक ते काय ?

हिंगणघाट येथील जळीतकांडातील पीडितेचा रुग्णालयात मृत्यू

७ दिवसांपूर्वी पेट्रोल ओतून जाळण्यात आलेल्या हिंगणघाट येथील महाविद्यालयीन शिक्षिकेचा १० फेब्रुवारीला सकाळी ६.५५ वाजता मृत्यू झाला. नागपूर येथील ऑरेंज सिटी रुग्णालयात तिच्यावर उपचार चालू होते. ३ फेब्रुवारी या दिवशी आरोपी विकी नागराळे याने तिच्यावर पेट्रोल ओतून तिला पेटवले होते.

सीएए आणि एन्.आर्.सी. यांच्या विरोधात ५ सहस्र ठिकाणी आंदोलन करण्याचे पी.एफ्.आय.चे षड्यंत्र

कायद्याच्या विरोधासाठी भारतातील जिहादी ५ सहस्र ठिकाणी आंदोलन करण्याचे नियोजन करतात. या उलट न्यायहक्कांसाठी लढा देण्यासाठी हिंदू किती ठिकाणी आंदोलन करतात ?

पाटलीपुत्र (बिहार) येथे घरात झालेल्या शक्तीशाली स्फोटात ७ जण घायाळ

शहरातील सालिमपूर अहरा येथील एका घरामध्ये झालेल्या स्फोटात ७ जण घायाळ झाले. हा स्फोट नेमका कसला होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी तो बॉम्बस्फोट असल्याचे म्हटले जात आहे.

कोणालाही त्रास देऊन विरोध केला जाऊ शकत नाही ! – सर्वोच्च न्यायालय

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात येथील शाहीन बाग परिसरात धर्मांधांकडून गेले ६० हून अधिक दिवस अवैधरित्या रस्ता बंद करून धरणे आंदोलन केले जात आहे. या विरोधात सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवर ‘कोणालाही त्रास देऊन विरोध केला जाऊ शकत नाही’, असे मत न्यायालयाने मांडले.

एका अन्वेषण यंत्रणेकडून एका राज्यातील साधकांची चौकशी

सनातनच्या साधकांच्या मागे पोलीस चौकशीचा वाढता ससेमिरा ! देशविरोधी कारवाया करणार्‍या जिहादी आतंकवाद्यांची नव्हे, तर राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी निःस्वार्थी वृत्तीने अहोरात्र झटणार्‍या सनातनच्या साधकांची चौकशी करणार्‍या अन्वेषण यंत्रणा !

हनुमान चालिसाचे वाटप करण्यापासून विहिंपला रोखण्याचा कोलकाता पोलिसांचा अयशस्वी प्रयत्न

तृणमूल काँग्रेसच्या बंगालमधील हिंदुद्वेषी पोलीस ! हनुमान चालिसा वाटल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होतो, असे म्हणणारे पोलीस बंगालचे कि बांगलादेशचे ?

विजेतेपद मिळवणार्‍या बांगलादेशाच्या क्रिकेटपटूंकडून भारतीय क्रिकेटपटूंशी आक्षेपार्ह वर्तन

बांगलादेशी खेळाडूंच्या धर्मांध वृत्तीमुळेच ते अशा प्रकारची कृत्ये करतात, तसेच ते भारतीय क्रिकेट संघाच्या विरोधात खेळतांना ‘जिहाद’ समजूनच खेळतात, असे कोणी म्हटल्यास आश्‍चर्य वाटू नये ! बांगलादेशी क्रिकेटपटूंकडून सातत्याने होणारे आक्षेपार्ह वर्तन पाहून या संघावर बंदीच घातली पाहिजे !

हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्यात अधिवक्त्यांचे सक्रीय योगदान आवश्यक ! – पू. नीलेश सिंगबाळ

राष्ट्र आणि धर्म यांवर होणार्‍या आघातांच्या विरोधात संवैधानिक मार्गाने लढण्यासाठी अधिवक्त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. अनेक अन्याय्य, भ्रष्टाचारी, अनैतिक घटनांच्या संदर्भात न्यायालयीन लढा देणे आवश्यक आहे.