महाराष्ट्रातील थोर संत ज्ञानेश्वर यांचे माहात्म्य !

‘कुठे जात, धर्म, प्रांत इत्यादी पहाणारे संकुचित वृत्तीचे आजचे राजकीय पक्षांचे पुढारी, तर कुठे ‘विश्वची माझे घर ।’ म्हणणारे संत ज्ञानेश्वर !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदू हे धर्म विसरल्याचाच हा परिपाक !

‘धर्मांधांना त्यांच्या धर्माकडून शक्ती मिळते; म्हणून ते धर्मासाठी आत्मसमर्पणही करतात. याच्या उलट हिंदू हे धर्म विसरल्यामुळे त्यांना काडी इतकीही किंमत (शक्ती) नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदूंमध्ये धर्मप्रेम नसल्याचा परिणाम !

‘मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्यात त्या त्या पंथियांची एकजूट असते. याउलट हिंदूंमध्ये तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी (धर्मद्रोही) धर्माविषयी विकल्प निर्माण करत असल्याने हिंदूंमध्ये धर्मप्रेम नाही. त्यामुळे त्यांची एकजूट नाही आणि ते इतर धर्मियांकडून प्रतिदिन मार खातात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

राजकारण्यांची मर्यादा !

‘देवस्थानांकडे आणि तीर्थक्षेत्री न बोलावता सहस्रो लोक येतात, तर राजकारण्यांना पैसे देऊन लोकांना सभेला बोलवावे लागते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

बुद्धीप्रामाण्यवाद्यांचा आत्मघातकी अहंकार !

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना अहंकार असल्याने त्यांना ईश्वराचा आशीर्वाद मिळत नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या शालेय शिक्षणाची दुर्दशा !

‘इतर देशांचा इतिहास अधिकाधिक २ – ३ सहस्र वर्षांचा आहे, तर भारताचा लाखो वर्षांचा, युगायुगांचा आहे. हे शाळेत शिकवत नाहीत. स्वातंत्र्यापासून आतापर्यंतचे शासनकर्ते याला उत्तरदायी आहेत. हिंदु राष्ट्रातच ही चूक सुधारण्यात येईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

वैज्ञानिक आणि ऋषि यांच्यातील भेद !

‘कुठे यंत्रांद्वारे संशोधन करून पालटते निष्कर्ष सांगणारे वैज्ञानिक, तर कुठे लाखो वर्षांपूर्वी यंत्राखेरीज आणि संशोधनाखेरीज अंतिम सत्य सांगणारे ऋषि ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अध्यात्माविषयी रात्रंदिवस विरोधी बोलणारे बुद्धीप्रामाण्यवादी !

‘एखाद्या विषयाचा आपला अभ्यास नसला, तर आपण त्याविषयी काही बोलत नाही; असे असले, तरी बुद्धीप्रामाण्यवादी अध्यात्म विषयाचा अभ्यास नसतांना आणि साधना केलेली नसतांना त्याबद्दल रात्रंदिवस विरोधी बोलतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

दैनिक ‘सनातन प्रभात’मधील प्रबोधनानुसार आजपासून कृतीला आरंभ करा !

‘सनातन प्रभात’ आधुनिक काळातील पुरोहित असून तो सतत देशस्थ (देशात रहाणार्‍या) हिंदूंना जागृत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. गेली २ तपे म्हणजे २४ वर्षे अखंडपणे ‘सनातन प्रभात’ प्रतिदिन प्रबोधनाच्या माध्यमातून समाजाला धर्मबोध, राष्ट्रबोध आणि साधनाबोध देत आहे.

स्वभावदोष आणि अहं असणार्‍यांमुळे त्रस्त होऊ नका, त्यांच्याविषयी सहानुभूती बाळगून त्यांना साहाय्य करा !

‘स्वभावदोष आणि अहं असणार्‍या व्यक्तीच्या आपण संपर्कात येतो, त्या वेळी तिच्या स्वभावदोषांमुळे होणार्‍या दुष्परिणामांनी आपण त्रस्त होतो अन् प्रसंगी तिला रागावतोही. येथे लक्षात घेतले पाहिजे की, त्या व्यक्तीच्या कधीतरी संपर्कात आल्यावर आपल्यावर इतका परिणाम होतो, तर त्या व्यक्तीला त्या दोषांमुळे किती अडचणी येत असतील !