स्वभावदोष आणि अहं असणार्‍यांमुळे त्रस्त होऊ नका, त्यांच्याविषयी सहानुभूती बाळगून त्यांना साहाय्य करा !

‘स्वभावदोष आणि अहं असणार्‍या व्यक्तीच्या आपण संपर्कात येतो, त्या वेळी तिच्या स्वभावदोषांमुळे होणार्‍या दुष्परिणामांनी आपण त्रस्त होतो अन् प्रसंगी तिला रागावतोही. येथे लक्षात घेतले पाहिजे की, त्या व्यक्तीच्या कधीतरी संपर्कात आल्यावर आपल्यावर इतका परिणाम होतो, तर त्या व्यक्तीला त्या दोषांमुळे किती अडचणी येत असतील !

‘सनातन प्रभात’प्रमाणे हिंदु राष्ट्राचे प्रचारक बनण्याचा निश्चय करा !

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वर्धापनदिनानिमित्त सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा संदेश

भारताच्या पराकोटीच्या अधोगतीचे कारण आणि त्यावरील उपाय

‘भारत पराकोटीच्या अधोगतीला जाण्याचे एकमेव कारण म्हणजे ‘आजार होऊ नये, यासाठी उपाय न करता आजार झाल्यावर वरवरचे उपाय करणारे स्वातंत्र्यापासून आतापर्यंतचे शासनकर्ते ! यावर एकमेव उपाय म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

आध्यात्मिक बळ आणि हिंदु राष्ट्र !

‘एका ॲटम्बॉम्बमध्ये लाखो बंदुकांचे सामर्थ्य असते, तसे आध्यात्मिक बळामध्ये भौतिक, शारीरिक आणि मानसिक बळांच्या अनंत पटींनी सामर्थ्य असते. असे असल्यामुळे धर्मप्रेमींनी ‘संख्याबळ अल्प असतांना हिंदु राष्ट्र कसे होईल ?’, याची काळजी करू नये.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

तिसरे महायुद्ध जवळ येत आहे !

‘आग घराजवळ येत असते, तेव्हा आपण प्राण वाचवण्यासाठी धावपळ करतो. आता तिसरे महायुद्ध जवळ येत असल्याने त्यात जिवंत रहाण्यासाठी साधना करा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

बुद्धीप्रामाण्यवाद्यांचे सर्वांत मोठे दोन दोष म्हणजे जिज्ञासेचा अभाव आणि ‘मला सर्व कळते’, हा अहंभाव !

‘मीही ४१ व्या वर्षापर्यंत देवाला मानत नव्हतो. पुढे संमोहन उपचारशास्त्राची मर्यादा कळल्यावर मी साधनेला लागलो. तेव्हा जिज्ञासेपोटी संतांना सहस्रो प्रश्न विचारून आणि साधना करून अध्यात्मशास्त्र समजून घेतले. नाहीतर मीही आणखीन एक निर्बुद्ध बुद्धीप्रामाण्यवादी झालो असतो !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

विज्ञानाचा एक लाभ !

‘विज्ञानाचा एक लाभ म्हणजे विज्ञानानेच विज्ञानाचे विश्लेषण खोडता येते आणि त्यामुळे बुद्धीप्रामाण्यवाद्यांचे तोंड बंद करता येते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

आतंकवाद्यांची कार्यपद्धत !

‘विमाने, रॉकेट, बॉम्ब इत्यादींच्या बळावर नाही, तर तयार केलेल्या आतंकवाद्यांच्या बळावर आतंकवादी जगातील सर्व देशांत भीती निर्माण करत आहेत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

इंग्रजी भाषेत ‘धर्म’ शब्दाला समानार्थी शब्दही नाही ! असे असतांना ते कधी धर्माचरण करू शकतील का ?

सर्व जगाची स्थिती अन् व्यवस्था उत्तम रहाणे, प्रत्येक प्राणीमात्राची ऐहिक उन्नती, म्हणजे अभ्युदय होणे आणि पारलौकिक उन्नतीही होणे, म्हणजे मोक्ष मिळणे, या तीन गोष्टी साध्य करणार्‍यास ‘धर्म’ असे म्हणतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले