राजकारणी आणि साधक यांच्यातील मूलभूत भेद !
‘राजकारणी स्वार्थामुळे पदासाठी एकमेकांशी भांडतात, तर त्याग केलेले साधक कोणत्याही गोष्टीच्या संदर्भात एकमेकांशी भांडत नाहीत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘राजकारणी स्वार्थामुळे पदासाठी एकमेकांशी भांडतात, तर त्याग केलेले साधक कोणत्याही गोष्टीच्या संदर्भात एकमेकांशी भांडत नाहीत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘हल्ली निवडणुकीत मत देतांना ‘जास्त चांगला कोण आहे ?’, याऐवजी ‘कमी वाईट कोण आहे ?’, याचा विचार करून मतदार मत देतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘कोणत्याही राजकीय पक्षाचे पदाधिकारी होण्यापेक्षा साधक किंवा शिष्य होणे लाखो पटींनी श्रेष्ठ असते; कारण राजकीय पक्षात गेल्यावर रज-तम गुण वाढतात, तर साधक किंवा शिष्य झाल्यास सत्त्वगुण वाढतो. त्यामुळे देवाकडे वाटचाल होते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
हिंदु राष्ट्रात शालेय शिक्षणापासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत ‘माणुसकी’ हा विषय सर्वांना शिकवला जाईल आणि सर्व सात्त्विक व्हावेत, यासाठी त्यांच्याकडून साधनाही करून घेतली जाईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
भक्ताला, साधना करणार्यालाच देव वाचवतो. हे लक्षात घेऊन आतापासून तीव्र साधना करा, तरच देव तिसर्या महायुद्धात वाचवील.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
वैद्यकीय क्षेत्र – आयुर्वेद एक उपवेद आहे. आयुर्वेदात व्यक्तीच्या वात, पित्त, कफ प्रधान प्रकृतीनुसार औषध देण्यात येते. याउलट ॲलोपॅथीत हे ज्ञात नसल्याने सर्वांना एकच औषध देण्यात येते. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
विश्व : आधुनिक विज्ञान केवळ दृश्य स्वरूपातील ग्रह-तार्यांबद्दलच थोडीफार माहिती सांगू शकते. याउलट अध्यात्मशास्त्र सप्तलोक आणि सप्तपाताळ येथील सूक्ष्म जगताची माहिती देते. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
आजच्या कलियुगात हिंदूंना जगभरच नाही, तर भारतातही अत्याचार होणारे हिंदू आपले वाटत नाहीत. त्यांना हिंदु धर्मापेक्षा जात महत्त्वाची वाटते ! त्यामुळे हिंदूंची आणि भारताची प्रत्येक क्षेत्रात परमावधीची अधोगती झाली आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पृथ्वीवर अभ्यासल्या जाणार्या सर्व विषयांत नवीन संशोधनामुळे पालट होतात; कारण ते सर्व विषय अपूर्ण आहेत. पालट होत असल्याने त्या विषयांचा पुनःपुन्हा अभ्यास करावा लागतो. डॉक्टरांना नवीन उपचारांच्या पद्धती, वकिलांना नवीन कायदे, संगणकवाल्यांना नवीन संगणकप्रणाली इत्यादींचा अभ्यास करावा लागतो.
‘बुद्धीपलीकडील काही अनुभवले, तर ते छापू नका’, असा अधिवक्त्यांचा सल्ला सर्वांना असतो ! त्यामुळे मानवाला फार मोठ्या घटना आणि त्यांचे शास्त्र यांपासून वंचित रहावे लागत आहे. हिंदु राष्ट्रात बुद्धीपलीकडील सांगणार्यांचा गौरव केला जाईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले