बुद्धीप्रामाण्यवाद्यांना लागणारे पाप !

बुद्धीप्रामाण्यवाद्यांच्या लक्षात येत नाही की, त्यांच्या चुकीच्या विचारांमुळे समाजाची दिशाभूल होत आहे आणि ते विचार आचरणात आणल्यामुळे समाजाचीही अधोगती होत आहे आणि समाजात रज-तम यांचे प्रमाण वाढत आहे.

धर्म सोडल्यामुळे हिंदूंमध्ये ऐक्य नाही !

‘हिंदूंमध्ये प्रदेशानुसार भाषा, जेवण, वेश इत्यादी सर्वकाही निराळे आहे. त्यांच्यामध्ये सामायिक आहे, तो केवळ धर्म ! आता हिंदूंनी धर्मच सोडल्यामुळे हिंदूंमध्ये ऐक्य राहिलेले नाही.’

चुकांमधून न शिकणारे हिंदू !

‘सर्वसाधारण व्यक्ती चूक झाल्यावर सुधारते; मात्र ‘सध्याच्या व्यवस्थेने देशाला रसातळाला नेले आहे’, हे लक्षात घेऊनही भारतातील हिंदू देशाची स्थिती सुधारण्यासाठी सात्त्विक राज्यकर्ते निवडून देत नाहीत.’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘विज्ञानाने विविध यंत्रे शोधून मानवाचा वेळ वाचेल असे केले; पण ‘त्या वेळेचा सदुपयोग कसा करायचा’, हे न शिकवल्याने मानव पराकोटीच्या अधोगतीला गेला आहे.’

ढोंगी बुद्धीप्रामाण्यवादी !

‘डॉक्टर, अधिवक्ता यांनी सांगितलेले बुद्धीप्रामाण्यवादी लगेच ऐकतात. त्यांना ‘का ? कसे ?’ विचारत नाहीत; मात्र संतांनी काही सांगितले, तर बुद्धीप्रामाण्यवाद्यांच्या मनात ‘का ? कसे ?’, असे प्रश्न निर्माण होतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले     

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘अनंत कोटी ब्रह्मांडनायकाचे इतर पंथात असते, तसे एकेका पुस्तकात वर्णन करता येईल का ? म्हणूनच हिंदु धर्मात सहस्रो ग्रंथ आहेत. त्यांतून पूर्ण माहिती मिळते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

हास्यास्पद पाश्चात्त्य शिक्षणप्रणाली !

‘पाश्चात्त्य शिक्षण कोणत्याही समस्येच्या मूळ कारणांपर्यंत, उदा. प्रारब्ध, अनिष्ट शक्ती, काळमहात्म्य येथपर्यंत जात नाही. क्षयरोग्याला क्षयरोगाचे जंतू मारणारे औषध न देता केवळ खोकल्याचे औषध देण्यासारखे त्यांचे उपाय आहेत !’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘सर्व रोगांना एकच औषध किंवा सर्व दाव्यांना एकच कायदा नसतो; पण राष्ट्र आणि धर्म यांच्या सर्व समस्यांना एकच उत्तर आहे अन् ते म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना !’

खरी दिवाळी कोणती ?

‘अंतःकरणात ज्ञानदीप प्रज्वलित करणे’, हीच खरी दिवाळी ! ज्ञान म्हणजे केवळ माहिती ! ‘झालेल्या ज्ञानाप्रमाणे सदाचरणाने जगणे’, हीच खरी दिवाळी होय.’