देहलीतील हिंदुत्वनिष्ठ लेखिका नीना राय आहेत लेखिका !
नवी देहली – प्रभु श्रीराम अयोध्येतील श्रीराममंदिरात परतल्यानंतर, म्हणजेच तब्बल ५०० वर्षांनी यंदाची ही पहिली दिवाळी आहे. अशातच ‘श्रीरामाची अयोध्या इतकी विलक्षण का आहे ? त्यात असे काय विशेष आहे की, ते जपण्यासाठी असंख्य हिंदूंनी स्वत:चे सर्वस्व पणाला लावले ?’, या प्रश्नांची उत्तरे ‘अद्भुत अयोध्या : प्रभु श्रीराम की दिव्य नगरी’ या पुस्तकात देण्यात आली आहेत. पुस्तकाच्या लेखिका नीना राय यांनी यासंदर्भात नुकताच ‘सनातन प्रभात’शी संवाद साधला. या वेळी त्या बोलत होत्या.
राय म्हणाल्या, ‘पुस्तक वाचतांना तुम्हाला अयोध्येचे गहन महत्त्व समजण्यासह तुमच्या हृदयात ‘हिंदू’ असल्याच्या अभिमानाचा एक नवा आणि उत्साहपूर्ण भाव प्रज्वलित होईल.’
Correction: After 500 years, it’s the first Diwali in Ayodhya in the presence of Shri Ramlalla!
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 2, 2024
या पुस्तकाचे प्रकाशन ‘ब्लूम्सबरी इंडिया’ने केले आहे. पुस्तकाचे मूल्य ३३५ रुपये असून ते अॅमझॉनवर खरेदीसाठी उपलब्ध आहे. हे पुस्तक हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांत उपलब्ध आहे. ‘अमेझिंग अयोध्या : द स्प्लेंडिड एन्शन्ट सिटी ऑफ लार्ड राम’ असे इंग्रजी पुस्तकाचे नाव आहे.
राय पुढे म्हणाल्या की,
१. भारताच्या पवित्र भूमीतील सम्राटांचा पाडाव केल्यानंतर मोगल बादशाह बाबराने निष्पाप हिंदूंवर भयंकर अत्याचार चालू केले. त्याने निर्दोष हिंदूंविरुद्ध अत्यंत घृणास्पद कृत्ये केली. यामुळेच त्याला ‘गाझी’ हे पद देऊ करण्यात आले, ज्याचा अर्थ आहे – काफिरांकडून ‘जार’ (संपत्ती), ‘जोरू’ (स्त्रिया) आणि ‘जमीन’ (भूमी) लुटणारा !’
२. बाबराला चांगलेच ठोऊक होते की, जोपर्यंत श्रीरामजन्मभूमीवर मंदिर उभे आहे आणि भगवान श्रीरामाला पूजले जात आहे, तोपर्यंत हे हिंदू काफिर इस्लाम स्वीकारणार नाहीत. परिणामी वर्ष १५२८ मध्ये त्याने मंदिर पाडले आणि त्याच्या अवशेषांवर बाबरी उभारली.
३. एवढा विनाशकारी विद्ध्वंस होऊनही हिंदूंनी त्यांच्या श्रद्धा त्यागल्या नाहीत. त्याऐवजी त्यांनी अयोध्येची ज्योत तेवत ठेवण्यासाठी स्वेच्छेने अक्षरश: काडीपेटीतील काड्यांसारखे स्वत:चे प्राणार्पण केले.
४. प्रभु श्रीरामाचे, मंदिराचे आणि अयोध्येचे तेज कोट्यवधी लोकांच्या हृदयात तेवत ठेवण्यासाठी केवळ सामान्य हिंदूंनीच प्राणार्पण केले, असे नाही, तर असंख्य कवी अन् लेखक यांनीही अखंड लेखन अन् गायन यांतून स्वतःचे अस्तित्व समर्पित केले.
अॅमेझॉनद्वारे हिंदी पुस्तक खरेदी करण्यासाठी लिंक :
https://www.amazon.in/-/hi/Neena-Rai/dp/9356409072
अॅमेझॉनद्वारे इंग्रजी पुस्तक खरेदी करण्यासाठी लिंक :
https://www.amazon.in/Amazing-Ayodhya-Splendid-Ancient-City/dp/9390358876/
लेखिका नीना राय यांचा संक्षिप्त परिचय !
नीना राय यांनी नवी देहलीतील प्रथितयश ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन’ येथून पत्रकारितेचे शिक्षण घेतल्यानंतर त्या अनेक वर्षे मध्य-पूर्वेत पत्रकार म्हणून कार्यरत होत्या. साधारण १० वर्षांनंतर देशाच्या सेवेसाठी त्या भारतात परतल्या. त्यांचा देहलीत व्यवसाय असून त्या हिंदु धर्माच्या अभ्यासकही आहेत.