खरा परमार्थी

खरा परमार्थी असतो तो सतत आत्मपरीक्षण करत असतो, त्याला दुसर्‍याचे अवगुण दिसतच नाहीत, त्याला आपल्याच अवगुणांचे इतके दर्शन होते की, त्याला इतर सर्वजण परमेश्वररूप भासतात.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘देवांना आणि संतांना प्रचार करावा लागत नाही. त्यांच्याकडे सहस्रो, लाखो लोक स्वतःहून येतात. याउलट राजकारण्यांना जनतेला बोलवावे लागते आणि कधी पैसेही द्यावे लागतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बुद्धीपलीकडील कार्यकारणभाव ठाऊक नसणारे बाल्यावस्थेतील विज्ञान !

‘एखादी घटना घडली की, विज्ञान ती घडण्यामागील केवळ भौतिक कारणांचा अभ्यास करते. त्यामागे काही कार्यकारणभाव असतो, हे विज्ञानाला अद्याप कळलेले नाही

गुरूंचे महत्त्व

गुरुदेव आणि गोविंद (ईश्वर) हे दोघे आपल्यासमोर उभे राहिल्यावर प्रथम कुणाचे चरण धरावे ? तर गुरुदेवांचेच चरण धरावे, म्हणजे त्यांना प्रथम वंदन करावे; कारण गुरुदेवांच्या कृपेने गोविंद (ईश्वर) दर्शन देतो.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘बुद्धीप्रामाण्यवादी धर्माचा वरवरचा अभ्यास करतात आणि ‘उथळ पाण्याला खळखळाट फार’ या म्हणीनुसार धर्माच्या विरोधात बोलतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

‘पुराणातील वानगी (उदाहरणे) पुराणात’, ही म्हण सार्थ ठरवणारे हिंदू !

‘हिंदु धर्मग्रंथांमध्ये ज्ञानाचा अनमोल असा ठेवा आहे. त्यात जीवनातील सर्व समस्यांवर उपाययोजना दिल्या आहेत, तरीही आज हिंदू पाश्चात्त्य विचारसरणी आणि तंत्रज्ञान यांच्या माध्यमातून स्वतःच्या जीवनातील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नरत आहेत.’

संतांचा आत्मकेंद्रितपणा !

जिज्ञासूला ‘त्याच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी अनेक साधनामार्गांपैकी कोणता मार्ग आवश्यक आहे ?’, हे लक्षात घेऊन त्याला त्या मार्गातील संतांकडे एकही संत पाठवत नाहीत. संतांच्या या वागण्यावरून ‘त्यांना स्वतःचा योगमार्ग सोडून इतर साधनामार्ग आहेत, हेही ज्ञात नसते का ?’, असा प्रश्न पडतो.’

गेल्या काही शतकांतील हिंदूंच्या दुर्बलतेचे कारण म्हणजे धर्मप्रेमाचा अभाव !

‘बाबरपासून आतापर्यंतच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप इ. थोडे धर्मप्रेमी सोडले, तर बाकी सर्व हिंदू राजे हिंदु धर्माविषयी प्रेम नसलेलेच होते. आजही हीच स्थिती आहे; म्हणून कोट्यवधी हिंदू मूठभर धर्मांध आक्रमकांसमोर हरतात !’

धर्माभिमानाचा अभाव आणि सहिष्णूतेचा अतिरेक असलेले हिंदू !

हिंदु धर्माच्या विरोधात कोणीही काहीही बोलले, तरी तो ‘विचारवंत’ किंवा ‘बुद्धीप्रामाण्यवादी’ ठरून त्याचे कौतुक केले जाते. याला ‘हिंदूंच्या धर्माभिमानाचा अभाव’ म्हणावे कि ‘हिंदूंच्या सहिष्णूतेचा अतिरेक’ म्हणावे ?’

धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदूंची झालेली दुःस्थिती !

‘स्वातंत्र्यापासून आजवर कोणत्याही पक्षाचे राज्यकर्ते आाणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी हिंदूंना धर्मशिक्षण दिले नाही. त्यामुळे आता हिंदूंना केवळ ‘रामायण, महाभारत’ हे शब्दच माहीत आहेत. त्यातील एकही शिकवण त्यांना आठवत नाही.’