(म्हणे) ‘ब्रिटनमध्ये विहिंप, चिन्मय मिशन आदी संघटना हिंदुत्वाच्या चळवळीचे काम करत असल्याने त्यांच्याशी संबंध तोडा !’ – Hindus For Human Rights

अमेरिकेतील ‘हिंदू फॉर ह्युमन राईट्स’ संघटनेने लंडनच्या महापौरांना लिहिले पत्र !

लंडनचे महापौर सादिक खान (वर्तुळात)

लंडन (ब्रिटन) – अमेरिकी संघटना ‘हिंदू फॉर ह्युमन राईट्स’ने इंग्लंडची राजधानी लंडनमध्ये दिवाळी साजरी करण्यावरून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या संघटनेचे संचालक राजीव सिन्हा यांनी लंडनचे महापौर सादिक खान यांना पत्र लिहून विश्‍व हिंदु परिषद, बी.ए.पी.एस्. (बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था), चिन्मय मिशन यांसारख्या हिंदु संघटनांशी असलेले सर्व संबंध तोडण्यास सांगितले आहे. या हिंदु संघटनांनी २७ ऑक्टोबर या दिवशी लंडनमधील ट्रॅफलगर स्क्वेअर येथे दिवाळी कार्यक्रम आयोजित केल्यामुळे ‘हिंदू फॉर ह्युमन राईट्स’ला संताप आल्याचे म्हटले जात आहे.

या संघटनेने सादिक खान यांना लिहिलेले पत्र सुहाग शुक्ला या हिंदुत्वनिष्ठ महिलेने ‘एक्स’वर शेअर केले आहे. या पत्रात या संघटनेने दावा केला आहे की, विहिंप, चिन्मय मिशन आदी हिंदु संघटना भारत आणि ब्रिटन येथील हिंदुत्व चळवळीसाठी आघाडी म्हणून काम करत आहेत.

संपादकीय भूमिका

हिंदूंच्या नावाने संघटना स्थापन करून हिंदूंमध्ये फूट पाडण्याचाच प्रयत्न अमेरिकेची ही संघटना करत आहे, असेच यातून लक्षात येते ! या संघटनेच्या मागे भारतविरोधी अमेरिकी सरकार आहे का ? याचा शोध घेणे आवश्यक आहे !