सनातनच्या साधकांना मिळणारे कल्पनातीत आध्यात्मिक ज्ञान !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ज्ञानाविषयी मार्गदर्शन
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ज्ञानाविषयी मार्गदर्शन
‘प्रजा सात्त्विक असली, तरच लोकशाहीला अर्थ असतो. प्रजा हल्लीसारखी स्वार्थी, तसेच राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भात निष्क्रीय असली, तर लोकशाही कशी असते, याचे भारत हे जगातील एकमेव केविलवाणे उदाहरण आहे !’
मंदिराच्या विश्वस्तांनो, दुकानदार गिर्हाईकाकडून पैसे घेऊन त्याला वस्तू देतो. तसे मंदिरवाले दर्शनाआधी किंवा नंतर पैसे घेतात. अशी हल्लीची स्थिती झाली आहे.
शरीर, मन, बुद्धी इत्यादी कोणत्याही गोष्टींच्या संदर्भात जगातील ७५० कोटींपैकी कोणत्याही दोन व्यक्तींत साम्य नाही !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘खरे सुख केवळ साधनेनेच मिळते, भ्रष्टाचाराने मिळवलेल्या पैशांनी नाही !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !
‘एका तरी शिक्षण- सम्राटाने ऋषिमुनींसारखे शिक्षणक्षेत्रात कार्य केले आहे का ? हल्लीचे शिक्षणसम्राट म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून अधिकाधिक पैसे मिळवणारे सम्राट !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘सध्याच्या शैक्षणिक पद्धतीनुसार अधिवक्ता, वैद्य, अभियंता होण्यासाठीचा अभ्यासक्रम एखाद्याने पूर्ण केल्यावर त्याला विद्यापिठाकडून तसे प्रमाणपत्र दिले जाते. पुढे त्या पदवीधारकाने त्याच्या शिक्षणानुसार कार्य केले नाही, तर…
‘इतर देशांना देशांतर्गत शत्रू नसतात. भारताला आतील आणि बाहेरील असे दोन्ही शत्रू आहेत. असे शत्रू असणारा जगातील एकमेव देश आहे भारत. भारतियांना हे लज्जास्पद !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘देव आपण केलेल्या कर्माचे फळ देतो’, अशी म्हण प्रचलित आहे. खरे तर ईश्वर आपण करत असलेल्या कृत्यांचा केवळ साक्षीदार असतो. आपण कर्म करतो, त्याच वेळी त्याचा चांगला किंवा वाईट परिणाम आपल्यावर होतो.