वयस्करांना आग्रहाने नव्हे, तर त्यांना विचारूनच खाण्यास द्यावे !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘भारतीय संस्कृतीमध्ये प्रेमाने खाऊ घालणे, फार महत्त्वाचे मानले आहे. यामध्ये ‘खाणार्‍याने संकोच करू नये’, यासाठी थोडा आग्रह केला जातो. हा आग्रह तरुणांसाठी उपयुक्त असतो. वयस्करांचा आहार त्यांची भूक, पचनक्षमता आणि अन्य शारीरिक अडचणी या घटकांवर अवलंबून असतो. त्यामुळे त्यांना आग्रह न करता त्यांना विचारूनच वाढावे.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३.११.२०२१)