बांदोडा (गोवा) येथील सौ. नम्रता विनय शास्‍त्री यांनी अधिकोषात नोकरी करतांना केलेली अध्‍यात्‍मप्रचाराची सेवा आणि त्‍याचा अधिकोषातील कर्मचार्‍यांना झालेला लाभ !

वर्ष १९९९ मध्‍ये माझे यजमान श्री. विनय दिनकर शास्‍त्री एक प्रदर्शन बघायला गेले होते. त्‍यांना तेथील सनातन संस्‍थेचा वितरण कक्ष वेगळा वाटला. ते साप्‍ताहिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार झाले.

घरच्‍या घरी नैसर्गिक पद्धतीने शेती करतांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती

दैनिक ‘सनातन प्रभात’मध्‍ये प्रसिद्ध होेणार्‍या लेखमालेतून घरच्‍या घरी नैसर्गिक पद्धतीने भाजीपाला पिकवण्‍यासाठी शास्‍त्रोक्‍त माहिती मिळाल्‍याने ‘त्‍याविषयी नेमकेपणाने कसे प्रयत्न करायचे ?’, याची माहिती मला मिळाली.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘वाढदिवस’ या शब्‍दाचा सूक्ष्मातून सांगितलेला अर्थ !

‘आश्विन कृष्‍ण षष्‍ठी (२७.१०.२०२१) या दिवशी माझा वाढदिवस होेता. त्‍या दिवशी सकाळी उठल्‍यावर मी सूक्ष्मातून परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या चरणी नमस्‍कार केला. त्‍या वेळी परात्‍पर गुरुदेवांच्‍या कृपेमुळेच माझे त्‍यांच्‍याशी सूक्ष्मातून अनुसंधान साधले गेले. तेव्‍हा आमच्‍यात पुढील संभाषण झाले.

पुणे येथील चि. अभिराम कुलकर्णी याला आंतरशालेय ‘मनाचे श्‍लोक’ पाठांतर स्‍पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्‍त !

चि. अभिरामने या स्‍पर्धेत मनाचे १२ श्‍लोक न अडखळता म्‍हटले. ध्‍वनीवर्धक नसतांनाही अभिरामने सर्वांसमोर खणखणीत आवाजात मनाचे श्‍लोक म्‍हटले.

वयाच्‍या ९० व्‍या वर्षीही कृतींमध्‍ये सातत्‍य ठेवणार्‍या आणि शिकण्‍याच्‍या स्‍थितीत रहाणार्‍या सनातनच्‍या ११३ व्‍या संत पू. विजया दीक्षितआजी !

‘बेळगाव येथील पू. विजया दीक्षितआजी (वय ९० वर्षे) रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात निवासाला आल्‍या होत्‍या. मला त्‍यांच्‍या समवेत एकाच खोलीत रहाण्‍याची अनमोल संधी मिळाली. या कालावधीत मला त्‍यांच्‍याकडून शिकायला मिळालेली सूत्रे कृतज्ञतापूर्वक त्‍यांच्‍या चरणी अर्पण करते.

घराच्‍या परिसरात असलेली झाडे, पक्षी अन् प्राणी यांच्‍याशी प्रेमाने संवाद साधून त्‍यांना आनंद देणारे सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर !

आमच्‍या घराच्‍या सभोवताली पुष्‍कळ मोठी (आंबा, फणस, काजू, सागवान यांची) झाडे आहेत. त्‍या झाडांवर अनेक पक्षी येऊन बसतात. ३०.१२.२०२२ या दिवशी घराच्‍या बाजूला असलेल्‍या आंब्‍याच्‍या झाडावर एक पक्षी बसला होता.

‘साधकाने ईश्‍वराचा ‘प्रीती’ हा गुण आत्‍मसात होण्‍यासाठी काय करावे ?’, याविषयी परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन !

‘एकदा एका सत्‍संगात एका साधिकेने परात्‍पर गुरु डॉक्‍टरांना पुढील प्रश्‍न विचारला, ‘‘तुम्‍ही सर्वांवर निरपेक्ष प्रेम करता. मला तसे जमत नाही. साधक कसा आहे ? त्‍याचे वय आणि प्रकृती पाहून माझे वागणे पालटत असते. त्‍यामुळे माझ्‍यात आपल्‍यासारखी ‘प्रीती’ नाही. हा गुण स्‍वतःत येण्‍यासाठी काय करायला हवे ?’’

‘पाठपुरावा घेणे, ही साधना आहे’, हा भाव ठेवून पाठपुरावा केल्‍याने स्‍वभावदोष आणि अहं न्‍यून होऊन गुणसंवर्धन होणे

‘साधना’ या भावाने सेवेचा पाठपुरावा करत असतांना ‘समोरच्‍या साधकाला काही अडचण आहे का ?’, असा विचार आल्‍यामुळेे त्‍याच्‍याकडून अपेक्षा न होता त्‍याला समजून घेण्‍याचे प्रमाण आपोआप वाढते. त्‍यामुळे साधकांकडून असलेल्‍या अपेक्षांचे प्रमाण न्‍यून होते.

आर्थिक परिस्‍थिती कठीण असतांनाही साधिकेने स्‍थिर राहून सेवेवर लक्ष केंद्रित केल्‍यामुळे तिला आनंद मिळणे

‘माझे यजमान अधिवक्‍ता असून ते एका ज्‍येष्‍ठ अधिवक्‍त्‍यांकडे नोकरी करत होते. नोकरी करत असतांना यजमानांना पुष्‍कळ ताण यायचा. त्‍यामुळे त्‍यांनी नोकरी सोडली; पण त्‍यानंतर लगेच दुसरी नोकरी मिळत नव्‍हती.

श्रीमती मेघना वाघमारे (वय ६४ वर्षे) यांचे खडतर जीवन आणि त्‍यांनी पदोपदी अनुभवलेली गुरुकृपा

रामनाथी येथील सनातनच्‍या आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करणार्‍या साधिका श्रीमती मेघना वाघमारे यांच्‍याविषयी त्‍यांचा मुलगा आणि मुलगी यांना जाणवलेली सूत्रे काल पाहिली. आज पुढील भाग पाहूया.